सांगोला येथे शेकापचे वतीने डॉ बाबासाहेब देशमुख यांनी
तहसीलदार संजय खडतरे विविध मागण्याचे दिले निवेदन...
सांगोला वार्ताहर (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
सांगोला तहसील कार्यालयात तहसीलदार संजय खडतरे यांची शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे
प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करून विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले
यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले सांगोला तालुक्यात यावर्षी पाऊस लांबल्याने सध्या
पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाची वाट बघुन आम्ही सर्व शेतकरी हतबल झालो आहोत.
गेल्या दोन वर्षापासुन मररोग पडल्याने डाळिंबाच्या बागा जळुन गेल्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग दुध व्यवसायाकडे वळला आहे.
त्यामुळे मोठ्याप्रमाणात जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.
या संकटातून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सांगोला तालुक्यातील टेंभु उपसा सिंचन योजना मान नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरुन मिळावेत.
तसेच सांगोला शाखा प्रकल्प- ५ व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे लाभ क्षेत्रातील सर्व वापर संस्थेच्या मागणीप्रमाणे पाणी मिळावे.
यास्तव पाण्याची जी काही आकारणी असेल ती भरण्यास आम्ही सर्व शेतकरी तयार असून या भयान संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे. तरी सहानुभूतीपूर्वक विचार करुन आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा,
शेतकऱ्यांचा पिक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई तातडीने शासनाकडे पाठपुरावा करा हंगिरगे गावातील
पी एम किसानचे ४५२ लाभार्थ ी वंचित आहेत याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करून अंमलबजावणी करावी अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.


0 Comments