नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी
या मागणीसाठी वाकी शिवणे येथे रास्ता रोको आंदोलन संपन्न
नांदेड जिल्ह्यातील बोडार हावेली या गावातील अक्षय भालेराव या युवकाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक काढल्याचा
राग मनामध्ये धरून. त्या गावातील जातीयवादी गावगुंडांनी अक्षय भालेरावचा खून केला.
या खुनातील प्रमुख आरोपी वरती कडक कारवाई करून त्यांना फाशी शिक्षा द्यावी. या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे या गावात दलित समाज बांधवांच्या वतीने
मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळात गाव बंद ठेवून सांगोला अकलूज रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन केले.
याबाबतचे निवेदन सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांना देण्यात आले. पोलीस प्रशासनाने या आंदोलनास चोक बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी या आंदोलनास प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून नांदेड येथील घटनेचा जाहीर निषेध केला.
यावेळी नितीन होवाळ, दीपक होवाळ, सचिन गोतसुर्य, बबन गोतसुर्य, सचिन होवाळ, सर्जेराव उबाळे, काशिलिंग आलदर, लक्ष्मण सिद, उमेश लवटे, दत्ता होवाळ,
अजित होवाळ, समाधान होवाळ, शहाजी होवाळ, राजु होवाळ, अनिल होवाळ, निलेश होवाळ, विशाल उबाळे, अमित कांबळे, संभाजी गोतसुर्य,
राहुल होवाळ, तात्या होवाळ, सतीश उबाळे, साहील पवार, हर्षद होवाळ, विशाल होवाळ, महेंद्र होवाळ, अमोल कांबळे, बापू मोरे, पंकज ठोकळे, बंटी काटे, आशोक होवाळ,
शंकर होवाळ, शकिल सावंत, संदिप गोतसुर्य, राहुल बुचडे, अतुल गवळी, बीटु फाळके इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.


0 Comments