google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला चिंचोली रोड परिसरात परप्रांतीय डाळिंब व्यापाऱ्यांनी विनापरवाना रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण कधी हटविणार नागरिकांची नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी

Breaking News

सांगोला चिंचोली रोड परिसरात परप्रांतीय डाळिंब व्यापाऱ्यांनी विनापरवाना रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण कधी हटविणार नागरिकांची नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी

 सांगोला चिंचोली रोड परिसरात परप्रांतीय डाळिंब व्यापाऱ्यांनी विनापरवाना


रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण कधी हटविणार नागरिकांची नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी

सांगोला शहरात नागरी वसाहत तसेच वाहनांची वर्दळ जास्त असलेल्या चिंचोली रोड परिसरात परप्रांतीय डाळिंब व्यापाऱ्यांनी विनापरवाना रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी डाळिंबाचे सौदे होत 

असल्यामुळे गर्दीदेखील होत आहे. यामुळे येथील अतिक्रमण कधी हटविणार, असा सवाल करत अतिक्रमण काढण्याची मागणी उपनगरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

 सांगोला डाळिंबाच्या उत्पादनासाठी जगभर आहेत. प्रसिद्ध आहे. देशभरातील परप्रांतीय व्यापारी सांगोल्यात निवासी राहून शेतकऱ्यांच्या थेट बागेत जाऊन डाळिंबाचीखरेदी करतात, 

तर काही व्यापारी शेतकऱ्यांकडून अडतीला आलेल्या डाळिंबाचे सौदे करून बाहेरच्या बाजारपेठेत पाठवतात. 

यासाठी मोठ्या संख्येने बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हरयाणा, कोलकाता, केरळ, चेन्नई आदी राज्यांतून परप्रांतीय व्यापारी, एजंट सांगोल्यात येऊन स्थायिक झाले. 

दरम्यान, मागील दोन-तीन वर्षांपासून डाळिंबावर तेल्या, मर, कुजवा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. 

त्यामुळे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडतीला आवक घटल्याने डाळिंब सौद्याचेप्रमाणही कमी झाले आहे. 

याचाच फायदा परप्रांतीय व्यापाऱ्यांनी घेऊन चिंचोली रोडवर रस्त्याच्या दुतर्फा दररोज सायंकाळी ५ वाजेच्या पुढे डाळिंबाचा बाजार (सौदे सुरू केले आहेत. 

या सौदेबाजीला ना कृषी उत्पन्न बाजार समितीची परवानगी आहे, ना नगरपरिषदेची. दररोज चिंचोली रोडवर चालणाऱ्या या सौदेबाजीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. 

या भागातील रहिवासी नागरिक महिला, शालेय विद्यार्थ्यांना गर्दीतूनच वाट शोधत ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावर परप्रांतीय व्यापारी, शेतकरी, एजंट यांच्या गर्दीमुळे सतत छोटे-मोठेगवळी यांनी सांगितले. अपघात घडत असतात.

शहरातील एखाद्या रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीला कोणी अडथळा करत असेल तर पोलिस प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, 

चिचोली रोडवर अशाप्रकारे कोणी अतिक्रमण केले असेल तर ते नगरपरिषदेकडू लवकरच हटवले जाईल. असे सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments