सांगोला तहसील कार्यालय सेतू सुरू होणे गरजेचे सर्वसामान्य जनतेची मागणी
सोलापूर जिल्ह्यातील जिल्ह्यासह सांगोला तहसील कार्यालयातील शासनाने सेतू कार्यालय बंद करण्याचा घेतलेला निर्णय शासनाने मागे घेणे गरजेचे असून
मागणी जोर धरत असताना दुसरीकडे मात्र शासनाने हा निर्णय अजून तरी मागे घेतले नसल्याचे दिसून येते. मुलांच्या परीक्षेच्या दिवस आहेत. त्यामुळे सेतू कार्यालयात गर्दी नाही.
परंतु ज्यावेळी जून महिन्यात शाळा सुरू होतील तेव्हा मात्र शासनाला सेतू कार्यालयाशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे सेतू कार्यालय सुरू करावे लागेल याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीजनतेतून जोर धरत आहे.
नागरिकांना दाखले एकाच ठिकाणी मिळावेत तसेच त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सेतू केंद्राची सोय करण्यात आली होती. ३१ मार्च २०२३ रोजी सेतूची मुदत संपल्याने १ एप्रिल २०२३ पासून सेतू केंद्र बंद करून महा ई सेवा केंद्रामार्फत दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली.
सध्या सोलापूर जिल्ह्यातील सेतू केंद्राची मुदत संपल्यामुळे ती केंद्रे बंद करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून निघाला आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय केवळ सोलापूर जिल्ह्यातच असल्याचे जाणवते..
राज्यात इतर ठिकाणी मात्र सेतू कार्यालय पूर्ववतअसल्याचे दिसून येते. सध्या सेतूमधे मिळणारे सर्व दाखले, प्रतिज्ञापत्र सेतू केंद्रामध्ये माफक दरात उपलब्ध होत होते सेतू बंद झाल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे
महा-ई-सेवा केंद्राचे संस्थाचालक सांगत असले तरी बऱ्याच ठिकाणच्या महा- ई-सेवा केंद्रात दर फलक नाहीत. त्यामुळे मनमानी पध्दतीने जनतेकडून दर आकारणी करत
असल्याचे जाणवते परंतु बऱ्याच ठिकाणी सर्वरचा प्रॉब्लेम येत असल्याने नागरिकांना दाखले वेळेवर मिळतात असे नाही.
जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष देऊन सांगोलातहसील कार्यालयातील सेतू कार्यालय सुरू करावे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी होत आहे.


0 Comments