सांगोला तालुक्यातील कॉलिफोरनिया म्हणून ओळख
निर्माण केलेल्या अजनानळे गावात खाजगी सावकारीचा सुळसुळाट...
सांगोला तालुक्यातील अजनाळे या गावात सावकार आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर क्षेत्रावर डाळिंबाची हजारो लागवड केलेली असून त्यापासून कोटी रुपयाचे उत्पन्न मिळवलेले आहे. परंतु गेल्या वर्षा पासून मरगण, तेल्या मुळे डाळिंब दर कमी झाले उत्पन्न कमी होवू लागले आहे.
खर्चवजा जाता डाळींब शेती परवडत नाही. खताचे दर गगनाला भिडलेले आहे. डाळिंबाचे बहार धरण्यासाठी अनेक शेतकरी यांनी खाजगी सावकार यांच्याकडून पैसे ५ ते १० टक्के दराने उचललेले आहेत. अनेक खाजगी
सावकार यांना व्याज व मुदल देऊन सुद्धा व्याजाला व्याज लावलेले आहे त्यामुळे येथील अनेक शेतकरी खाजगी सावकाव्याच्या त्रासाला कंटाळले आहेत.
अनेक शेतकरी यांनी उचललेल्या रख्खमेपेक्षा दुप्पट रक्कम दिलेली असतानासुद्धा राहिले पैशासाठी तगादा लावत आहेत. खाजगी सावकर शेतकरी यांना कुठे तक्रार करायची असेले तिथे कर म्हणून धमकी देत आहेत. शेतकरी सुद्धा खाजगी सावकाराच्या त्रासाला वैतागले आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष देणार का?
चौकट
शहर ग्रामीण किंवा तालुक्यात
अजनाळे गावात अशाप्रकारे खाजगी सावकार त्रास देत असतील तर त्यांनी सहाय्यक निबंधक किंवा सांगोला पोलीस स्टेशन येथे तक्रार देणेबाबत पोलीस अधिक्षक, सोलापूर
ग्रामीण पोलीस यांनी सुचना केलेली आहे.


0 Comments