google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यकर्त्यांनी समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत- डॉ भाई बाबासाहेब देशमुख

Breaking News

राज्यकर्त्यांनी समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत- डॉ भाई बाबासाहेब देशमुख

राज्यकर्त्यांनी समाजामध्ये शांतता प्रस्थापित


करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत- डॉ भाई बाबासाहेब देशमुख

कोळा (वार्ताहर शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क):- सध्या राजकारणामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची काही कमतरता राहीली नाही. वेगवेगळ्या पक्षातील अनेक नेते राजकारण करीत असताना नको ते बोलून जात आहेत..

 लगेचच त्या वक्तव्याला जशास तसे उत्तर सुध्दा दिले जात आसते. त्यामुळे वाद विवाद वाढत जातोय व त्यांचा परीणाम समाजातील शांततेला तडा जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

सांगोला तालुक्याचे आकरा वेळा प्रतिनीधीत्व केलेले आमदार स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांनी प्रदिर्घ काळ राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. परंतु एवढ्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी कोणावरही व्यक्तीक टिका-टिपण्णी केली नाही..

 कींवा हेतुपुरस्कर कोणावरती वादग्रस्त टिपण्णी केली नाही. जे काय बोलायचे असेल ते चुकीच्या धोरणावरती बोलायचे, चुकीच्या कामावरती बोलायचे, उगीचच सतत वादग्रस्त वक्तव्य करीत बसायचे नाही.. कींवा खालच्या पातळीवर जाऊन कोणत्याही नेत्यावरती वयक्तीक बोलायचे नाही एवढे नियम

 आबासाहेबांनी स्वतः ला लावुन घेतले होते.. कायम आचारसंहीतेत राहुन संविधानीक पध्दतीने राजकारण केले व त्या राजकारणातुनच आबासाहेबांनी समाजकारण साधले तोच आचार विचार सध्याच्या राज्यकर्त्यांनी अंगीकारला पाहीजे. राज्यातील शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते आबासाहेबांचा आचार व विचार यावरती वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 जनतेशी बांधीलकी जपत आहेत.. राजकारण करीत आसताना शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते कधीही वादग्रस्त वक्तव्य करीत नाहीत व समाजातील शांततेला तडा जाईल असे वर्तन तर अजिबात करीत नाहीत. कारण शेतकरी कामगार पक्ष हा वैचारिक अधिष्ठानावरती वाटचाल करणारा पक्ष आहे... 

आमचा कार्यकर्ता विचारांने जोडलेला आहे... आमच्या कार्यकर्त्यांना सत्ता असो वा नसो त्याचा काडीमात्र फरक पडत नाही..एवढे मजबुत वैचारिक अधिष्ठान शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आहे.

सध्या आपण वेगवेगळ्या प्रसारमाध्यमे कींवा सोशल मीडियावरती गरजनसणारी वक्तव्ये पहात ऍकत असतो ती समाजहिताची बिल्कुल नसतात. बोलणारे बोलुन जातात व समाजामध्ये चुकीचा मेसेज जात ताबडतोब जात असतो हे ते विसरतात.

 राजकारण हे समाजाची सेवा करण्यासाठीचे प्रभावी साधन आहे. राजकारणाच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचवण्याचे काम राजकारणातुन होऊ शकते. भाषणामध्ये अनेक नेते समाजहिताच्या गप्पा मारतात.. 

मग आपण जर समाजसेवा करण्याच्या साठी सर्वजण राजकारण करीत आसचाल तर मग समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल, वाद निर्माण होईल असे वर्तन टाळले पाहिजे ना... राजकारणातील लहान मोठा कोणताही कार्यकर्ता आसो त्यांनी सर्व समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवुनच काम केले पाहिजे.. 

समाजामध्ये सर्व धर्म समभाव रुजविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न राज्यकर्त्यांनी केले पाहिजेत. समाजहित डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रात काम करणारे काही चांगले नेते होऊन गेलेत काही आज ही कार्यरत आहेत... परंतु आशा नेत्यांची संख्या कमी प्रमाणात आहे हे सुद्धा कटु सत्य स्विकारले पाहीजे.

 सध्या राजकारणामध्ये काम करीत असताना अनेक प्रश्न प्रलंबीत असल्याचे पहावयास मिळत आहे. शेतकरी, कष्टकरी, बेकारी, कामगार, महिला, विद्यार्थी यांच्या प्रश्नावरती म्हणावे तसे कोणी आवाज उठवताना दिसत नाहीत. कोरोना काळापासून अनेक लहान व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.

 शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, दुष्काळ आशा कठीण परिस्थितीत आपली शेती पिकवावी लागत आहे. शेतीच्या उत्पादन खर्चाच्या मानाने शेतीचे उत्पादन म्हणावे तसे हातात येताना दिसत नाही. असे अनेक प्रश्न प्रलंबीत असताना व ते सोडवणे गरजेचे असताना उगीचच वेगळे प्रश्न जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहेत 

व जे प्रश्न जनतेशी निगडीत आहेत त्या प्रश्नांना बगल दिली जात आहे. आसे न होता सर्व नेत्यांनी राजकीय क्षेत्रात काम करीत असताना चुकीचे न वागता न बोलता समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत

 असे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments