सांगोला तालुक्यातील घेरडी गावचे सुपुत्र,भारतीय सैन्य दलातील
शहिद जवान सुरेश नारायण पुकळे (मेजर) यांचा अपघाती निधन
सांगोला तालुक्यातील घेरडी गावचे सुपुत्र,भारतीय सैन्य दलातील शहिद जवान सुरेश नारायण पुकळे (मेजर) यांचा अपघाती निधन झाले. भारतमातेचे वीरसुपुत्र ते १२वर्षापासून सैन्य दलात कार्यरत होते
त्यांनी आंध्रप्रदेशातील सिकंदराबाद, पश्चिम बंगाल, उत्तराखंड,उत्तर प्रदेश अशा विविध ठिकाणी आपली देशसेवा बजावली आहे.सध्या ते हिमाचल प्रदेशात दोन वर्षांपासून कार्यरत होते.मागील महिन्यांमध्ये ८मे रोजी सुट्टीवर गावी आले होते.
सुट्टीसंपल्यावर पुन्हा ते देशसेवेसाठी कामावर जाण्यापूर्वी दिनांक २९मे रोजी त्यांचा अपघात झाला.या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जखमी झालेले शिवाजी पुकळे (मेजर) यांना उपचारासाठी तात्काळ सोलापूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
तेथून त्यांना पुणे येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.व तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.परंतु त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद न दिल्याने रविवारी दिनांक ११/०६/२०२३रोजी पुणे येथील सैन्य दलातील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली.
शिवाजी पुकळे हे सेवा बजावत असताना त्यांचे दुःखद निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.शहिद जवान शिवाजी पुकळे यांच्या मागे आई, वडील,पत्नी, दोन मुले,भाऊ,भावजय व त्यांची मुले,असा परिवार आहे.
आज सोमवार दिनांक १२जून रोजी १२वाजया त्यांची घेरडी गावातून त्यांची अंत्ययात्रा फुलांनी सजविलेल्या ट्राॅलीमधून निघणार असून मानवंदना देवून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.घेरडी गावच्या वतीने मानवंदना देण्याकरिता वारकरी संप्रदायाच्यावतीने दिंडी मिरवणूक
व पांडुरंगाच्या गजरात साश्रू नयनांनीसर्व गावकरी मंडळी, वारकरी, टाळकरी, माळकरी दिंडी मिरवणूकीनंतर मानवंदना देण्यात येणार आहे.. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐वीर जवान अमर रहे...शहिद जवान तुझे सलाम🙏


0 Comments