google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना...बाल दिंडीला जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून मुलाची गळफास घेऊन आत्महत्या गुणापवाडीतील घटना : सांगोला तालुक्यातून हळहळ व्यक्त

Breaking News

धक्कादायक घटना...बाल दिंडीला जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून मुलाची गळफास घेऊन आत्महत्या गुणापवाडीतील घटना : सांगोला तालुक्यातून हळहळ व्यक्त

धक्कादायक घटना...बाल दिंडीला जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून


मुलाची गळफास घेऊन आत्महत्या  सांगोला तालुक्यातील गुणापवाडी येथील घटना

सांगोला बाल दिंडीला जाण्यासाठी पित्याने दुचाकी दिली नाही म्हणून रामाच्या भरात एका १४ वर्षीय मुलाने साडीने आंभळीच्या झाडास फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

या घटनेनंतर सांगोला तालुक्यात सर्वसामान्यातून हळहळ व्यक्त झाली.यश राजेंद्र काळे (वय १४, रा. गुणापवाडी, ता. सांगोला) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून

गुरुवार, २९ जून २०२३ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास सांगोला तालुक्यात गुणापवाडी येथे ही घटना घडली.

याबाबत पांडुरंग विठोबा वाघमोडे (रा.गुणापवाडी, ता. सांगोला) यांनी पोलिसात खबर दिली आहे.

यश काळे हा (रा. बेवनूर, ता. जत) येथील एका हायस्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकत होता. गुरुवार, २९ जूनला त्याच्या हायस्कूलमध्ये

 आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली होती. या दिंडीला जाण्यासाठी त्याने वडिलांकडे दुचाकी मागितली. 

त्यावेळी वडिलांनी त्यास मला पंढरपूर वारीला जायचे आहे म्हणत मोटारसायकलदेण्यास नकार दिला. 

त्यानंतर वडील पंढरपूरला निघून गेले अन् यशने रागाच्या भरात घराच्या पाठीमागे डोंगराच्या पायथ्याशी

 जाऊन जांभळीच्या झाडाच्या फांधीला साडीने परिसरातील मेंढपाळांना तो झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 

त्यांनी यशच्या घरी आईशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यानंतर नातेवाइकांनी तातडीने त्याला डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वी मरण पावल्याचे घोषित केले.

Post a Comment

0 Comments