google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला-जतरोडवर सोनंदजवळ अपघात मुलीस सासरी सोडायला निघालेला पिता कार-टेम्पो अपघातात ठार मुलगी गंभीर जखमी

Breaking News

सांगोला-जतरोडवर सोनंदजवळ अपघात मुलीस सासरी सोडायला निघालेला पिता कार-टेम्पो अपघातात ठार मुलगी गंभीर जखमी

सांगोला-जतरोडवर सोनंदजवळ अपघात मुलीस सासरी सोडायला


निघालेला पिता कार-टेम्पो अपघातात ठार मुलगी गंभीर जखमी 

सांगोला मुलीला सासरी सोडण्यासाठी निघालेल्या पित्याच्या कारला टेम्पोने समोरून जोराची धड़क बसली.

 या अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर डोक्याला मार लागून मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सुरेश मारुती बोबलादे (वय ५४, रा. लक्ष्मीदहिवडी, ता. मंगळवेढा) असे मृत पित्याचे नाव असून, हा अपघात गुरुवार २९ जून रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास सांगोला 

जतरोडवर सोनंद येथेचव्हाण मळा परिसरात घडला. या अपघातात त्यांची मुलगी भक्ती प्रभु संक्रट्टी (वय १९, रा. वाळेगिरी, ता. अथणी, जि.बेळगाव)

 ही जखमी झाली असून, तिच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी बोबलादे यांचा मुलगा शुभम सुरेश बोबलादे (रा. लक्ष्मी दहिवडी) याने फिर्याद दिली आहे.

पोलिस सूत्राकडील माहितीनुसार सुरेश बोबलादे यांची मुलगी भक्ती हिचा दि. २९ मे रोजी बाळगिरी (ता. अथणी) येथील प्रभू संकट्टी यांच्याशी विवाह झाला होता. विवाहनंतर मुलगी माहेरी आली होती.

 तिला सासरी सोडण्यासाठी गुरुवार, दि. २९ जून रोजी दुपारी उच्या सुमारास वडील सुरेश बोबलादे है कार (एम.एच.१३/ बी.एन. ५७६३) घेऊन लक्ष्मी दहिवडी येथून सांगोला मार्गे बाळेगिरीला निघाले होते.

 त्यांची कार सांगोला- जतरोडवरून सोनंदजवळील चव्हाण मळा परिसरात आली असता भरधाव वेगातील टेम्पो (एम.एच. १०/ ए. ४९१५) ने समोरून जोराची धडक दिली. अपघातातील टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

या अपघातात पुढच्या दोन्ही सीटवर बसलेले सुरेश बोबलादे व मुलगी भक्ती हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर टेम्पो मालकानेच उपचाराकरिता दोघांना 

सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सुरेश बोबलादे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले

Post a Comment

0 Comments