कोळा येथील कै. शंकर मोरे यांच्या कुटुंबीयास माजी आमदार दीपक आबा साळुंखे- पाटील यांची सांत्वन पर भेट.
कोळा /(प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
कोळा येथील माजी पोलीस पाटील कै. शंकर बुधाजी मोरे यांचे मागील दोन दिवसापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते,
त्यांच्या कुटुंबीयास महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. दीपक आबा साळुंखे -पाटील यांनी त्यांच्या कोळा येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली.
यावेळी मोरे कुटुंबियांना धीर देऊन दादांनी आजपर्यँत केलेल्या कामकाजाचा आलेख सांगितला व दादाच्या अपूर्ण राहिलेल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे कामकाज पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून सर्वस्वी प्रयत्न करेन असे सांगितले.
यावेळी माजी सरपंच शहाजी हातेकर, युवक नेते हरीभाऊ सरगर, बापू कोळेकर, अस्लम पटेल, शिवाजी कोळेकर, सतीश काटे, विनोद काटे, धनंजय काटे, संतोष काटे, अभिमन्यू मोरे, विष्णू सरगर उपस्थित होते.
0 Comments