google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 '' मी शेकापचा कार्यकर्ता म्हणूनच कामं करत राहीन...'' विरोधकांच्या टीकेची पर्वा करत नाही, आबासाहेबांप्रमाणे...''; सांगोल्यात बाबासाहेब देशमुखांनी दंड थोपटलं

Breaking News

'' मी शेकापचा कार्यकर्ता म्हणूनच कामं करत राहीन...'' विरोधकांच्या टीकेची पर्वा करत नाही, आबासाहेबांप्रमाणे...''; सांगोल्यात बाबासाहेब देशमुखांनी दंड थोपटलं

'' मी शेकापचा कार्यकर्ता म्हणूनच कामं करत राहीन...'' विरोधकांच्या टीकेची पर्वा करत नाही,


आबासाहेबांप्रमाणे...''; सांगोल्यात बाबासाहेब देशमुखांनी दंड थोपटलं 

'' मी शेकापचा कार्यकर्ता म्हणूनच कामं करत राहीन...''दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा मला पुढे चालवायचा आहे. आबासाहेबांनी आयुष्यभर कष्टकरी, सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी घालवली. 

सर्वसामान्यांसाठी मीही आज माझा वेळ देत आहे. पुरोगामी विचार तरुणांमध्ये रुजवण्याचा माझा प्रयत्न आहे असे मत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.

सांगोल्यात डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी 'सरकारनामा'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील राजकीय वाटचालीवर भाष्य केलं. देशमुख म्हणाले, 

स्वर्गीय आबासाहेब हे सांगोला तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राजकारण्यांसाठी एक आदर्शवत नेतृत्व होते. त्यांनी सुरू केलेले समाजसेवेचे कार्य आम्ही थोड्याफार प्रमाणात पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहे.

 माझ्यावर काही जणांकडून वारसाची टीका होत असली तरी मला त्याची पर्वा नाही. मला फक्त आबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवायचा आहे व तो चालवण्याचा मी प्रयत्न करत आहे.

गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षामध्ये पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख सध्या प्रयत्न करताना दिसत आहेत. 

प्रत्येक दिवशी विविध गावच्या आलेल्या लोकांच्या भेटी घेते, विशेषतः राजकारणात सक्रिय असलेल्या तरुणांना घेऊन ते आज गावा-गावात जाऊन शेकापच्या जुन्या - नव्या नेत्यांशी सुसंवाद साधताना दिसत आहेत.

आबासाहेबांच्या निधनानंतर शेकापच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांना विविध झालेल्या निवडणुकांच्या निकालांमधून उत्तर मिळाले आहे. टीका करणाऱ्यांकडे मी जास्त लक्ष देत नाही.

 आबासाहेबांप्रमाणे सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवणे मला नेहमीच आवडत राहील अशीही भूमिका देशमुख यांनी मांडली.

निवडणुकांपेक्षा जनसामान्यांची कामे महत्त्वाची...

येणाऱ्या निवडणुकांबाबत बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. झालेल्या सहकार संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही शेकापचं वर्चस्व कायम ठेवलं आहे. 

परंतू, सध्या सर्वसामान्यांचे असलेले शेतीमालाचे भाव, दूधाचे दर, तालुक्यातील विविध पाणी योजनांचे नियोजन याबाबतच लक्ष केंद्रित केले आहे. मी शेकापचा कार्यकर्ता म्हणूनच कामं करत राहीन असंही देशमुख म्हणाले.

Post a Comment

0 Comments