वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात स्वागत समारंभ संपन्न.
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात गुरुवारी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात पाचवीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला.
यावेळी सुरुवातीस प्रशालेच्या प्रवेशद्वारावर सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यामुळे विद्यार्थ्यात उत्साह व नवचैतन्य दिसून आले.
तदनंतर सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन संस्था सचिव नीलकंठ शिंदे सर यांनी पुष्पहार समर्पित करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी सर्वच विद्यार्थ्यांनी आगामी शैक्षणिक वर्षात गुणवत्ता वाढीसाठी कटिबद्ध राहून वर्षभरात विविध शैक्षणिक उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सप्त गुणांना वाव देणार असल्याचे सांगून सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत
आपुलकीने केले. प्रशालेतील इयत्ता सहावी ते दहावी मधील देखील विद्यार्थ्यांची स्वागत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले शेवटी आभार मुख्याध्यापक आर एम पवार सर यांनी मानले.



0 Comments