Breaking News

ब्रेकिंग न्यूज... मंगळवेढ्याचे नूतन डी वाय एसपी विक्रांत गायकवाड यांनी स्विकारला पदभार

ब्रेकिंग न्यूज... मंगळवेढ्याचे नूतन डी वाय एसपी विक्रांत गायकवाड यांनी स्विकारला पदभार


मंगळवेढ्याचे नूतन डी वाय एस पी विक्रांत हिम्मतराव गायकवाड यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला असुन सर्व सामान्य लोकांना न्याय देणार असल्याचे सांगितले.

पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड हे इंदापूर तालुक्यातील भाट निमगावचे सुपुत्र असून ते सन २०१६ मध्ये एमपीएसीसी परीक्षा उत्तीर्ण झाले.

त्यानंतर त्यांनी नाशिक येथे प्रथम क्रमांकाने ट्रेनिंग पूर्ण केले. त्यानंतर ते २०१८ मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून गडचिरोली जिल्ह्यात रुजू झाले होते.

त्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह मिळालेले असून पोलिस महासंचालक पदक पटकवणारे ते इंदापूर तालुक्यातील पहीलेच अधिकारी आहेत.

Post a Comment

0 Comments