कोळे ता.सांगोला येथे विसावा कॉर्नर जवळ दोन दुचाकीची
समोरा-समोर जोरदार धडक तिघेजण गंभीर जखमी...
कोळे वार्ताहर:-(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क )
बुधवार दि.14 रोजी दुपारी 3.30 वाजता सांगोला तालुक्यातील कोळा -जुनोनी मार्गांवर दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार भिषण धडक होऊन तीन जखमी.
प्रवीण खरात रा. पाचेगाव बु ता. सांगोला हा कोळाहुन आलदर पेट्रोलपंप वर पेट्रोल टाकण्यासाठी भरधाव वेगाने हिरो होंडा स्पेल्डर मोटारसायकल
गाडी क्र.एम एच.10 सी.जी.2516 वरून निघाला होता. त्याचवेळी जुनोनी हुन कोळा मार्ग
आटपाडी (यपाचीवाडी) येथे शंकर घेरडे रा.थबडेवाडी ता.क.महंकाळ व सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकचे संचालक शरद चव्हाण रा.यपाचीवाडी ता.आटपाडी हे दोघेजण
मुलांचा शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी सी.बी शाईन या मोटारसायकल वरून गाडी क्र.एम.एच 10 डी.ई 9077 निघाले होते
यावेळी कोळा हद्दीतील कोळा - जुनोनी रोडवरील विसावा कॉर्नर जवळ दोन मोटारसायकलची
समोरासमोर जोरदार धडक होऊन सदर झालेल्या अपघातामध्ये तिघेजण गंभीररित्या जखमी झालेले आहेत.
सदर ठिकाणी अपघात झाला होता. त्या अपघात ठिकाणी अपघातग्रस्त व्यक्तींना एका तासानंतरही प्रथम उपचार सेवा मिळाली नाही. अपघातग्रस्त व्यक्तींना पुढील उपचारासाठी खाजगी वाहनामधून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हणमंत सरगर
(सामाजिक कार्यकर्ते कोळे) :-
सांगोला रुग्णालय संलग्न कोळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एक रुग्णवाहिका उपलब्ध असून सदर रुग्णवाहिका सेवा देण्यास अपुरी पडत असल्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून आणखी एक रुग्णवाहिका उपलब्ध करावी.


0 Comments