कासार सिरसी येथील पोस्ट ऑफिस चा कारभार असमाधानी
कासार शिरसी येथील सब पोस्ट ऑफिस चा कारभार बऱ्याच दिवसापासून अ समाधान पद्धतीने चालत असल्याच्या तक्रारी समोर आल्या
असून या कार्यालयातून ग्राहकांना समाधानकारक उत्तरे मिळत नसून बाहेर गावावरून आलेले पार्सल टपाल विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी जनतेतून करण्यात येत आहेत
कासार शिरशी चे पोस्ट ऑफिस सध्या रामभरोसे तत्त्वावर चालत असून या कार्यालयात बाहेरून येणारे पॅन कार्ड आधार कार्ड पार्सल वेळेत वितरण होत नसल्याच्या तक्रारीत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे
येथील एका ग्राहकाने पोस्टातील सुकन्या योजनेबाबत माहिती विचारली असता येथील एसपीएम बोटले मास्तर यांनी सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली
असल्याचे सांगण्यात आले येथील पोस्ट ऑफिस लोकाभिमुख व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे



0 Comments