धक्कादायक ...चुकीचे इंजेक्शन दिले ; चार वर्षीय श्रद्धाचा जीव गेला
चुकीचे तीन इंजेक्शन्स
देण्यात आल्याने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. भिवंडी शहरातील सनलाईट हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली असून
त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
श्रद्धा कांबळे असे मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव असून तिच्या नातेवाईकांनी डॉक्टर परिचारिकेला मारहाण केली आहे. श्रद्धाला उलट्या होत असल्याने वडील नितीन यांनी उपचारासाठी
भिवंडीच्या सनलाईट रुग्णालयात दाखल केले. रात्री आठ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी श्रद्धाला लागोपाठ तीन
इंजेक्शन दिले, त्यानंतर अचानक श्रद्धाची प्रकृती बिघडली. बेशुद्ध झाल्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी श्रद्धाला मृत घोषित केले.
श्रद्धाच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात संताप व्यक्त करत तोडफोड केली. मृत श्रद्धाच्या वडिलांनी डॉक्टर परिचारिकेला मारहाण केल्याची माहिती आहे.
त्यानंतर घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थिती आटोक्यात आणली आहे.


0 Comments