google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज... केमिकल टँकर पलटी होऊन लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू,तिघांची ओळख पटेना.!!!

Breaking News

ब्रेकिंग न्यूज... केमिकल टँकर पलटी होऊन लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू,तिघांची ओळख पटेना.!!!

ब्रेकिंग न्यूज... केमिकल टँकर पलटी होऊन लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू,तिघांची ओळख पटेना.!!!


लोणावळा :-द्रुतगती मार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली.


या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एकाची तर जखमी झालेल्या दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही.

रितेश महादू कोशिरे (वय 17, रा. कुणेगाव, ता. मावळ), कुशाल केलास वरे (वय 9, रा. तुंगार्ली, लोणावळा), सुनीता केलास वरे (वय 35, रा. तुंगार्ली, लोणावळा) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 

टँकर मधील एका मयताची ओळख पटलेली नाही. टँकर मधील अन्य दोघेजण जखमी झाले आहेत.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिट येथे केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकर पलटी झाला. पलटी झालेल्या टँकरने पेट घेऊन मोठ्या प्रमाणात आग लागली. 

यात टँकर मधील अनोळखी व्यक्ती जागीच ठार झाला. टँकर मधून आग लागलेले केमिकल सांडून ते उड्डाणपुलावरून झाली सांडले.

त्यावेळी पुलाखालून जाणाऱ्या एका दुचाकीवर पेटलेले केमिकल पडले. त्यात रितेश आणि कुशाल हे जागीच ठार झाले. तर सविता यांना उपचारासाठी 

पुणे येथील ससून रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. टँकर मधील अन्य दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्यासह महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

रुग्णवाहिका, देवदूत, केमिकल एक्सपर्ट टीम, अग्निशमन विभागाच्या पथकांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

आगीच्या घटनेत मयत झालेले दोघेही शाळकरी विद्यार्थी

आगीच्या घटनेत मयत झालेला कुशल कैलास वरे हा नऊ वर्षाचा असून तो लोणावळ्यातील गुरुकुल शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत होता. 

रितेश महादू कोशिरे हा 18 वर्षाचा असून लोणावळ्यातील व्हिपीएस महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होता. जखमी सविता वरे ह्या राजमाची गावातील असून कुणेगाव येथे एका बंगल्यावर पतीसह माळीकाम करतात.

आज सकाळी ते तिघे दुचाकीवरुन लोणावळ्यात आले होते. पुन्हा माघारी कुणेगाव येथे जाताना पुलाखाली आगीचा लोळ त्याचा काळ बनून आला. कोणाला स्वप्नात देखील वाटणार नाही अशा पद्घतीने त्या दोन्ही बालकांचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments