google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यस्तरीय आदर्श संपादक सन्मान पर्सन आँफ द ईअर २०२३ हा पुरस्कार चाँद भैय्या शेख यांना जाहीर

Breaking News

राज्यस्तरीय आदर्श संपादक सन्मान पर्सन आँफ द ईअर २०२३ हा पुरस्कार चाँद भैय्या शेख यांना जाहीर

 राज्यस्तरीय आदर्श संपादक सन्मान पर्सन आँफ द ईअर २०२३ हा पुरस्कार चाँद भैय्या शेख यांना जाहीर 


(  कौतुकास्पद - अवघ्या सात दिवसात दोन राज्यस्तरीय पुरस्कार ) 


सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे व कमी कालावधीत सीबीएस न्युज या डिजिटल नेटवर्क च्या माध्यमातून  गरूडझेप घेणारे चाँदभैय्या शेख हे हल्ली जरा जास्तच चर्चेत आले आहेत . 

गेल्या ६ जून २०२३ ला धम्म भवन चँरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने राजर्षी शाहू प्रेरणा हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छा वर्षात व सत्कार समारंभ पार पडत असतानाच परवा 11 जून २०२३ ला 

आदर्श फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने  राज्यस्तरीय आदर्श संपादक सन्मान पर्सन आँफ द ईअर २०२३ हा पुरस्कार झाला आहे .त्यामुळे सर्वत्र चाँद भैय्या शेख यांचे कौतुक होत आहे .चाँद भैय्या शेख यांनी आपल्या 16 वर्षाच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या कार्यकाळात

 विविध प्रश्नांना वाचा फोडून गल्ली ते दिल्ली पर्यंत बातम्या प्रकाशित करून जनसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. सामाजिक पत्रकारितेसोबतच विकास व शोध पत्रकारितेत त्यांनी नक्षलग्रस्त, दुर्गम व दुष्काळी जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फोडली.

भैय्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे केलेल्या सामाजिक कार्याची आणि झुंझार, निर्भीड, निःपक्ष पत्रकारितेची नोंद...अर्थात चं भैय्यांना विविध संस्थेच्या वतीने ९२पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे  परंतु, ध्यानीमनी नसतानाच ज्या सुखद घटना घडतात, 

त्याचा आनंद काय वर्णावा!भैय्या हे चळवळीतील कार्यकर्ते, निर्भीड, पत्रकार मनमिळाऊ स्वभावचे असल्याने त्यांचा दांडगा जण संपर्क आहे. तसेच कामगार कर्मचान्यांना न्याय देण्यासाठी त्यांना एकजूट करून सतत काम करीत आले आहेत.  

विशेषतः राज्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा विषयांचे बातमीपत्र गाजले आहेत.  अलीकडेचं वाड्मयातील नामांकित समाजसेवक म्हणून देखील मोठा नावलौकिक मिळवला आहे.यातच त्यांची लोकप्रियतेचे गमक आहे.

मात्र हे यश ही लोकप्रियता ,हा मानसन्मान त्यांनी मोठ्या कष्टातुन व जिद्दीतुन मिळवला आहे.ते देखील तितकेचं खरे.....त्यामुळेचं गावागावातील लोक व विषेश तरूणाई त्यांची फँन झालेली आहे.आपल्या लिखाणाने लोक अस्वस्थ करणारे

 चाँदभैय्या यांच्यासारखे पत्रकार फार अपवादानेचं आढळतात त्यामुळेचं त्यांनी आपले वेगळेपण महाराष्ट्रात कितेक वर्षे कायमचं जपले आहे. अनेक वर्ष निर्भीडपणे पत्रकारिता करत असल्यानं त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे .

विशेषतः पुरस्कार हे कोणाला हि मिळत नसता त्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम करावे लागते . विशेषतः हा ९३ वा पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी कळताचं महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments