आबासाहेबां प्रमाणे माझ्यावर आपण विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख
सांगोला प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) :
उदनवाडी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा तसेच विविध सहकारी संस्थांच्या नुतन चेअरमन – व्हा चेअरमन व संचालक मंडळाचा व गुणवंत विद्यार्थींचा व
सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचा सत्कार पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या व शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई दादशेठ बाबर यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न करण्यात आला होता..
सत्कार समारंभापुर्वी डॉ भाई बाबासाहेब देशमुख व भाई दादाशेठ बाबर यांची उघड्या जिपमधुन भव्य मिरवणुक काढण्यात आली सदर मिरवणुकीमध्ये फटाक्यांची आजषबाजी करण्यात आली तसेच तिन जेसीबी मधुन मुक्त पणे फुलांची उधळण करण्यात आली.
डि.जेच्या व हालग्यांच्या तालावरती तरुण कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता.मिरवणुकीमध्ये महिलांनी पाहुण्यांचे औषण करुन स्वागत केले तसेच महिला मोठ्या प्रमाणात मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अकोल्याचे नंदकुमार शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की..आजतागायत जेवढ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वगुणाची झलक तालुका वासीयांना पहावयास मिळाली.
स्व आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत पक्षाची धुरा समर्थपणे बाबासाहेब देशमुख घेऊन जात आहेत.येणाऱ्या काळात तालुक्यातील युवकांची फळी आणखीन घट्ट करुन, युवकांना संघटित करण्याचे काम डॉ बाबासाहेब देशमुख हे करतील यात शंका नाही
शेवटी बोलताना पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कुठलीही संघटना,कुठलीही संस्था ही कोणी एकटा चांगल्या प्रकारे चालवु शकत नाही.त्यासाठी संघटीत असणे गरजेचे आहे
विचारांने एकसंघ राहणे महत्वाचे आहे..आपण व आपल्या कुटुंबातील अनेकांनी आबासाहेबासोबत काम केले आहे त्यांच्या विचारांचा पगडा एवढा घट्ट आहे की.त्यामुळे आपणास सामुहीक यश प्राप्त होत आहे.
सध्या राजकीय , सामाजिक परसस्थीती बदलत आहे सध्या राज्यापुढे अनेक समस्या आहेत विशेषता शिक्षणाच्या बाबतीत सरकारची उदासिनता पहावयास मिळत आहे विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या पहाता शिक्षक वर्ग अतिशय कमी प्रमाणात आहे..हजारो-लाखो शिक्षक भरत्या रखडलेल्या आहेत.
एकाएका वर्गातील विद्यार्थी संख्या एवढी आहे की..शिक्षकांना ज्ञानार्जन करणे कठिण होत आहे आशा परिस्थीतीत आपण शिक्षकांकडुन फार अपेक्षा ठेवत असतो..गुणवंत व दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा ठेवत असताना
त्या शिक्षकांना सस्या प्रकारच्या सुख सोयी..तसेच वाजवीपेक्षा जास्त विद्यार्थी एकाच वर्गात नसावेत..या कडे लक्ष दिले पाहिजे तरच येणाऱ्या काळात दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल यासाठी सरकारने योग्य पावले उचलली पाहिजेत
तीच अवस्था आरोग्य विभागांमध्ये आहे..जे सरकारी दवाखाने आहेत त्या मध्ये सुध्दा आरोग्य कर्मचाऱ्या़ंची संख्या अत्यंत कमी प्रमाणात आहे.
त्यामुळे जे कर्मचारी सेवा देतात त्या कर्मचार्यांवरती ताण पडत आहे.व त्याचा परिणाम आरोग्य सेवेवरती होत आहे..कित्येक आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा आहे पॅरासिटीमाॕल सारखी पन्नास पैशाची गोळी सुध्दा आरोग्य केंद्रात उपलब्ध नाही.
ही अतिशय गंभिर बाब आहे सरकारने आशा गोष्टी कडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.आशा अनेक गोष्टीकडे सरकारने लक्ष केंद्रित केले पाहिजे परंतु सध्या आशा महत्वाच्या प्रशांना जाणीवपूर्वक बगल दिली जात आहे.
सध्या शेतीव्यवसाय अडचणीत असुन अवकाळी पाऊस,दुष्काळ,शेतीमालाचे अनियमीत भाव आशा संकटात शेतकरी पुरता हैराण झालेला असताना शेतकरी वर्ग दुध व्यवसायाकडे वळाला आहे अनेक शेतकऱ्यांनी दुधाचा व्यवसाय निवडला असताना..
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दुधाचे दर कमी झाले आहेत.त्यामुळे पुन्हा शेतकरी -पशुपालक पुंन्हा अडचणीत आला आहे.आशा जनतेच्या निगडीत प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी लवकर शेतकरी कामगार पक्ष आंदोलन उभे करणार आहे.
आजपर्यंत आपण स्व आबासाहेबांच्या वरती प्रेम केलं आहे व आजही करत आहात तसेच प्रेम व विश्वास माझ्यावरती आपण दाखवता त्या विश्वासाला कदापीही हि तडा जाऊ देणार नसल्याचे डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगीतले.
कार्यक्रमाच्या शेवटी युवा नेते व उद्योजक प्रशात वलेकर व दुसरे नेते संदीप सावकर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत केक कापुन सत्कार करण्यात आला
सदर कार्यक्रमास तालुक्यातील आजी-माजी जि.प.सदस्य,आजी-माजी पंचायत समिती सदस्य विविध संस्थांचे आजी माजी चेअरमन व्हा चेअरमन व संचालक,तसेच पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष -उपाध्यक्ष तसेच आजी माजी सरपंच -उपसरपंच ग्रा.प़.सदस्य, सोसायटीची आजी- माजी चेअरमन व सदस्य उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिगंबर पांढरे-गुरुजी,दिगंबर शिंगाडे,आबासाहेब आलदर,अशोक वलेकर,रंगनाथ रुपनर,नामदेव लवटे,बालेखान शेख,बंडखोर गुरुजी,तानाजी वलेकर,
प्रशांत वरेकर ,संदिप सरगर,बबन गाडे,नाथा केंगार यांच्या सहित शेतकरी कामगार पक्षाचे व पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले असल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.


0 Comments