आपल्या सांगोला तालुक्यातील सुवर्ण व्यावसायिकांना कर्नाटक(बेंगलोर )पोलिसांकडून वारंवार होत असलेल्या नाहक त्रासाबद्दल आज डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री
महोदय श्री सिद्धरामय्यासाहेब यांना भेटून निवेदन देत या होणाऱ्या त्रासाबद्दल सविस्तर माहिती दिली
त्यावरती तात्काळ त्यांनी प्रशासनास व वरिष्ठ पोलीसबांधवांना यावरती माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सुचना करत आमच्या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद दिला.
आपले सुवर्ण व्यावसायिक बांधवांचे नेहमीच आपल्या व्यवसायाकरिता ,काही खरेदी विक्री करिता राज्याबाहेर जाणे येणे चालू असते,त्यात अशा व्यावसायिकांना नाहक व होणार जाचक त्रास आपण
एक सुजाण नागरिक प्रतिनिधी म्हणून त्याची दखल घेऊन त्यावरती तोडगा काढणं ही जबाबदारी शिरोधैर्य मानून आज घेतलेली ही भेट सत्कारणी लागेल हा विश्वास व्यक्त केला
0 Comments