पुणे जिल्हा हादरला...प्रियकराच्या मदतीने तिघांचा महिलेवर सामूहिक बलात्कार
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पासून जवळ असलेल्या गावात चार जणांनी मिळून एका महिलेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणात घोडेगाव पोलिसांनी चौघांपैकी एकाला ताब्यात घेतलं आहे. पण या घटनेने पुणे जिल्हा हादरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला प्रियकर आकाश चंद्रकांत भालेराव बरोबर मोटारसायकल वरून अज्ञात ठिकाणी जात होते.
त्यावेळी मोटरसायकल वरून संदेश अशोक जाधव, संजय आणि आदेश अशोक जाधव हे तिघे आले. त्यांनी सदर महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच जर कोणाला याबाबत सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
पण महिलेने तात्काळ घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना आपबीती सांगितली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत चौघांविरोधत तक्रार दाखल केली.
यातील आकाश चंद्रकांत भालेराव याला पोलिसांनी पकडले असून तिघांचा तपास सुरू आहे. घोडेगाव पोलिसांनी गँग रेपचा गुन्हा दाखल केला आहे. पण या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सदर गुन्हा पोलीस उपनिरीक्षक महेश पवार यांनी दाखल केला आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस करत आहेत. महिला अत्याचारात वाढ झाल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.
0 Comments