ठरलं… भगीरथ भालके “या” दिवशी करणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
यांच्या उपस्थित “बीआरएस” मध्ये प्रवेश : राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसणार फटका
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपुरातील नेते भागीरथ भालके यांच्या गटाची बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये सर्वांची मते जाणून घेवून येत्या 27 जूनला भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश करणार आहेत.
सध्या तेलंगणमध्ये BRS ची सत्ता आहे. बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत येत्या 27 जूनला भागीरथ भालके तेलंगण राष्ट्र समिती या पक्षामध्ये प्रवेश करतील.
यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले, अडचणीच्या काळात प्रमुख नेता गेल्यानंतर आमच्या पाठिशी ज्या पद्धतीने उभे रहायला पाहिजे होते,
तसे कोणी राहिले नाही. आमच्यावरच टिकाटिप्पणी झाली, त्यामुळे नक्कीच स्वाभिमानाला ठेच लागली. आम्ही जनभावनेचा आदर करुन भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे”
असं भागीरथ भालके म्हणाले. चंद्रशेखर राव यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, 400 गाड्याचा ताफा येणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी भागी़रथ भालके बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत.
0 Comments