मोठी बातमी.. भाजप, सेनेच्या 'या' आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी; मंत्रिमंडळ विस्तार लवकरच
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यता वर्तवण्याच्या तारखा वारंवार समोर येत आहेत.
त्यातच रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.
या भेटीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याची माहिती काही वृत्तपत्रांनी दिली आहे.
तर शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळणाऱ्या आमदारांची संभाव्य यादी
भाजप व शिवसेनेतील आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आमदारांची नावं देखील समोर आली आहे. भाजपकडून विदर्भ संजय कुटे, मुंबई योगेश सागर, किसन कथोरे, मनीषा चौधरी, रणधीर सावरकर, गणेश नाईक, पश्चिम महाराष्ट्र माधुरी मिसाळ, समाधान आवताडे, रणजीतसिंह मोहिते-पाटील,
मराठवाडा मेघना बोर्डीकर, उत्तर महाराष्ट्र जयकुमार रावल, देवयानी फरांदे यांची नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून कोकण योगेश कदम, भरत गोगावले, विदर्भ बच्चू कडू , संजय रायमूलकर, संजय गायकवाड, मराठवाडा संजय शिरसाट,
प. महाराष्ट्र अनिल बाबर, प्रकाश आबिटकर मुंबई यामिनी जाधव, उ. महाराष्ट्र चिमणराव पाटील, सुहास कांदे यांना मंत्रिपद मिळू शकते अशी माहिती समोर येत आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज 18 लोकमतने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
सध्याच्या घडीला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या एकनाथ शिंदे गटासह आणि भाजपचे २० मंत्री आहेत. यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. विधानसभेच्या एकूण सदस्यांची संख्या लक्षात घेता २३ जणांना मंत्रिपद दिले जावू शकते.


0 Comments