पुणे पुन्हा हादरलं ! प्रेम संबंधाला अडथळा ठरणार्या पतीची पत्नी व मुलीकडून हत्या;
क्राईम वेब सिरीज पाहून केलं काम ‘तमाम’
अलिकडील काळामध्ये पुणे शहर आणि परिसरातील गुन्हेगारी घटनांमध्ये वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे. वाघोली परिसरात मैत्रिणीने केलेला मित्राचा खून असो की मग मावळ तालुक्यातील गहुंजे गावात पत्नी अंकिताने केलेला पती सुरज काळभोरचा खुन आता पुन्हा एकदा पुण्याला हादरवून सोडेल अशीच घटना समोर आली
आहे. प्रेम संबंधाल अडथळा ठरणार्या पतीची पत्नी आणि अल्पवीयन मुलीने व तिच्या प्रियकराने मिळून हत्या केली आहे. या खून प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खून प्रकरणी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे तर इतर दोघांना अटक करण्यात आली आहे.
अॅग्नेल जॉय कसबे (23, रा. साईकृपा सोसायटी, वडगाव शेरी, पुणे) आणि सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (43, रा. ए 16, तिसरा मजला, गुडविल वृंदावन आनंदपार्क, वडगाव शेरी, पुणे) अशी अटक केलेल्याची नाव आहे. सॅन्ड्रा हिच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तिघांनी मिळून जॉन्सन कॅजीटन लोबो (49) यांचा खून केला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी अॅग्नेल कसबे याचे सॅन्ड्राच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ते संबंध सॅन्ड्राला मान्य होते पण जॉन्सन लोबो यांना मान्य नव्हते. आरेपी सॅन्ड्रा आणि पत्नी जॉन्सन यांच्यात त्यावरून नेहमी वाद होत होते.
जॉन्सनला कायमचा दूर करण्याच्या उद्देशाने सॅन्ड्रा आणि तिच्या अल्पवयीन मुलीने वेगवेगळया क्राईम बेब सिरीज पाहून त्याची गेम करण्याचा कट रचला.
त्यानंतर 30 मे रोजी मध्यरात्री जॉन्सन हे घरात गाढ झोपले असताना आरोपींनी त्यांच्या डोक्यात वरवंटा घातला. तसेच, त्यांच्या मानेवर चाकूने वार करून त्यांच्या निर्घृण खून केला.
एक दिवस त्यांनी त्यांच्या मृतदेह घरातच ठेवला. त्यांनी दुसऱ्या दिवशी मृतदेह एका कारमधून सणसवाडी जवळील एका मोकळ्या मैदानात पेट्रोल टाकून जाळून टाकला.
जॉन्सन त्यांच्या पत्नी असलेल्या आरोपी सॅन्ड्रा हिने खून झाल्याचे कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी पतीचा फोन सुरूच ठेवला होता. ती दररोज त्यांचे व्हाट्सअप स्टेटस बदलायची. तिचा रविवारी (दि. 4) वाढदिवस होता. तिने पतीच्या मोबाईल वरून स्वतः आपल्याच वाढदिवसाचे स्टेटस ठेवले. नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांच्या लक्षात
हा प्रकार येऊ नये म्हणून त्यांनी या युक्त्या वापरल्या. मात्र, पोलिसांनी गुन्हयाचा सखोल तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सणसवाडी परिसरात मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज
तपासले असता त्यांना एक कार संशयास्पदरित्या दिसून आली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने 230 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून ही कार शोधून काढली. घटनेच्या दिवशी ही कार आरोपी अग्नेल चालवत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर खुनाला वाचा फुटली.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टेउपविभागीय पोलिस अधीकारी यशवंत गवारी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर
शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे
पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे , पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर ,सहाय्यक उपनिरीक्षक तुषार पंदारे, जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार जनार्धन शेळके, राजु मोमीन, योगेश नागरगोजे,
अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, पोलिस नाईक विकास पाटील, शिवाजी चितारे, निखील रावडे, किशोर शिवनकर यांनी खून प्रकरण उघडकीस आणले आहेत.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर,पोलिस हवालदार सचिन होळकर, चंद्रकांत काळे करीत आहेत.


0 Comments