google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ... विवाहित प्रियकराने केली लिव्ह इन पार्टनर प्रेयसीची हत्या?

Breaking News

धक्कादायक ... विवाहित प्रियकराने केली लिव्ह इन पार्टनर प्रेयसीची हत्या?

धक्कादायक ... विवाहित प्रियकराने केली लिव्ह इन पार्टनर प्रेयसीची हत्या?


कोलकत्ता - लेफ्टनंट कर्नलला पश्चिम बंगालच्या कोलकाता येथून अटक करण्यात आली. 

कर्नलवर त्याच्या लिव्ह-इन पार्टनरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. 

विशेष म्हणजे तो विवाहित असून त्याला मुले आहेत. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

कर्नलने त्यांची लिव्ह-इन पार्टनर प्रज्ञा दीपा हलदर सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि लेखक होती. पोलिसांनी सांगितले की, 

लष्करी अधिकारी कौशिक सरबाधिकारी यांना सुसाईड नोट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे अटक करण्यात आली आहे.

 ज्यामध्ये प्रज्ञा यांनी कौशिकच्या अत्याचाराबाबत लिहिले होते. पोस्टमॉर्टममध्ये प्रज्ञा दीपा हलदरच्या शरीरावर जखमांच्या खुणाही आढळून आल्या आहेत. 

कौशिक विवाहित असून त्याची पत्नी आणि दोन मुली दक्षिण कोलकाता येथे राहत असल्याचे तपास अधिकाऱ्यांना आढळून आले आहेत.

 दरम्यान प्रज्ञा हलदर यांचा मृतदेह सापडल्यानंतर कौशिक सर्वाधिकारी बेपत्ता होते. पोलीस त्याचा शोध घेत होते.

 मात्र, पकडल्यानंतर आपण आजारी असल्याचा दावा केला असून त्याला उपचारासाठी बॅरकपूर कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांनी त्याला रुग्णालयातूनच अटक केली. कोर्टात हजर केल्यानंतर कौशिकला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 प्रज्ञाने लिहिलेली सुसाईड नोट सापडल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे.

प्रज्ञा दीपा हलदरच्या कुटुंबीयांनी बॅरकपूर आयुक्तालयात लेफ्टनंट कर्नल कौशिक सरबाधिकारी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. 

चार वर्षांपूर्वी प्रज्ञा लेफ्टनंट कर्नल कौशिक यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटल्या होत्या. नंतर दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. ते भेटले आणि नंतर प्रेमात पडले. पण त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Post a Comment

0 Comments