google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सांगोला शहरात महालक्ष्मी शू पॅलेस दुकानाचे पत्रे उचकटून ३ लाख ७१ हजाराची चोरी

Breaking News

मोठी बातमी..सांगोला शहरात महालक्ष्मी शू पॅलेस दुकानाचे पत्रे उचकटून ३ लाख ७१ हजाराची चोरी

मोठी बातमी..सांगोला शहरात  महालक्ष्मी शू पॅलेस


दुकानाचे पत्रे उचकटून ३ लाख ७१ हजाराची चोरी 

सांगोला /( प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

चप्पलच्या दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा कापून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश करून विविध प्रकारचे साहित्य व रोख रक्कम

असे एकूण तीन लाख ७१ हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरी केल्याची घटना

२० जून रात्री साडेआठ ते २१ जून सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान सांगोला येथील महालक्ष्मी शू पॅलेस या दुकानात घडली आहे. मयूर मधुकर माळी (रा. मुळगाव मापटेमळा, आटपाडी, ता.आटपाडी,

 सध्या मिरज रोड, सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा व ज्योती शशिकांत सावंत (रा. बनकर वस्ती, सांगोला, ता. सांगोला) या दोघामध्ये महालक्ष्मी शु पॅलेस हे दुकान मिरज रोड येथील सदानंद हॉटेलजवळ मागील दोन वर्षापासून चालवत आहेत.

२० जुन रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी दोन-तीन दिवसापासूनची दुकानात विक्री केलेली रोख रक्कम एक लाख १८ हजार रुपये ठेवून दुकान बंद करून घरी गेले होते.

 दिनांक २१ जून रोजी नेहमीप्रमाणे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास दुकानात प्रवेश केले असला त्यांना पाठीमागील बाजूचा पत्रा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कापलेला दिसला. 

अज्ञात चोरट्याने दुकानातील रोख रक्कम एक लाख १८ हजार तसेच दुकानातील विविध प्रकारचा माल / साहित्य असा एकूण तीन लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रार मयूर माळी यांनी सांगोला पोलिसात दिली आहे.

Post a Comment

0 Comments