google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संतापजनक ! व्हॉट्सअप स्टेट्सला औरंगजेबाचा फोटो ठेवला

Breaking News

संतापजनक ! व्हॉट्सअप स्टेट्सला औरंगजेबाचा फोटो ठेवला

 संतापजनक ! व्हॉट्सअप स्टेट्सला औरंगजेबाचा फोटो ठेवला


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरात 

मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील मुख्य चौकात दोन गटात राडा झाल्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे.

 याशिवाय कोल्हापूर पोलिसांनी येत्या १९ जूनपर्यंत शहर परिसरात जमावबंदी लागू केली आहे. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी समाजकंटकांनी वादग्रस्त पोस्ट शेयर केल्यानंतर त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता. 

त्यानंतर शहरातील मुख्य चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. याशिवाय शहरातील अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 कोल्हापुरात काल काही तरूणांनी आपल्या व्हॉट्सअपला औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो स्टेट्सला ठेवले होते. ज्यानंतर ही बाब हिंदुत्ववादी संघटनांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करत या तरुणांवर कारवाई करण्याची विनंती केली. 

त्यानंतर या संघटनांनी दुपारपर्यंत वाट पाहिली, पण या प्रकरणी कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या तरूणांनी पोलीस स्टेशनच्या समोरच ठिय्या आंदोलन करण्यास सुरूवात केली. 

या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरात आज बंदची हाक देण्यात आली आहे. कोल्हापुरातील काही भागात काल दंगलही झाली. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments