google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक,” सांगली शहरात 100फुटी रोडवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ,नालसाब मुल्ला यांच्यावर आठ गोळ्यांचा वर्षाव… तर पुण्यातही गोळीबार "सुरज तात्याबा लंगार हा २१ वर्षीय तरुण जखमी

Breaking News

धक्कादायक,” सांगली शहरात 100फुटी रोडवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ,नालसाब मुल्ला यांच्यावर आठ गोळ्यांचा वर्षाव… तर पुण्यातही गोळीबार "सुरज तात्याबा लंगार हा २१ वर्षीय तरुण जखमी

 धक्कादायक,” सांगली शहरात 100फुटी रोडवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ,नालसाब मुल्ला यांच्यावर


आठ गोळ्यांचा वर्षाव… तर पुण्यातही गोळीबार "सुरज तात्याबा लंगार हा २१ वर्षीय तरुण जखमी

काल सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला हे गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातल्या 100 फुटी जवळ ही घटना घडली आहे. नालसाब मुल्ला ,राहत्या घराजवळ रात्री पोलिसांनी घटनास्थळावरून आठ पुंगळ्या जप्त केल्या आहेत. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री साठेआठच्या सुमारास घडली आहे. जवळपास अज्ञातांनी हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सांगलीतील चेतना पेट्रोल पंप जवळील गुलाब कॉलनी नजीकच्या शंभर फुटी रस्त्यावर ही गोळीबाराची घटना घडली. बुलेट वरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी नालासाब मुल्ला याच्यावर आठ राऊंड फायर करत गोळीबार केला. 

हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दोन-तीन गोळ्या लागल्या होत्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे असं समजतंय. या खळबळजनक घटनेमुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे..

बाकी, “घटनेचा सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळावर सात ते आठ पुंगळ्या मिळाल्या आहेत. या गोळीबारामगील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लवकरच या घटनेचा तपास केला जाईल.”अस पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आज दुपारी पुण्यातही अशीच गोळीबाराची घटना समोर आली होती.  पुण्यातील (Pune) वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती.

 या घटनेत मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी ३ राऊंड फायर केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारात सुरज तात्याबा लंगार हा २१ वर्षीय तरूण जखमी झाला आहे.

Post a Comment

0 Comments