google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 "रानगव्याच्या हल्ल्यात म्हैस जागीच ठार" इंदापूरात इथे घडली घटना ! बंदोबस्त कधी?

Breaking News

"रानगव्याच्या हल्ल्यात म्हैस जागीच ठार" इंदापूरात इथे घडली घटना ! बंदोबस्त कधी?

 "रानगव्याच्या हल्ल्यात म्हैस जागीच ठार" इंदापूरात इथे घडली घटना ! बंदोबस्त कधी? 


“या परिसरात असणाऱ्या वनव्याचा बंदोबस्त करण्याकामी परवानगीसाठी वरिष्ठ कार्यालयाबरोबर पत्र व्यवहार केलेला आहे. 

जी दुर्घटना झालेली आहे त्यास शासकीय नियमाप्रमाणे तात्काळ नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.” – अजित सुर्यवंशी,इंदापूर वन परिक्षेत्र अधिकारी

पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील कांदलगाव,हिंगणगांव,तरटगांव भागात रानगव्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या अनेक दिवसापासून हा रानगवा या परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करत आहे.

आज पुन्हा एकदा हिंगणगाव मध्ये सतिश विक्रम खबाले या शेतकऱ्याच्या 80 हजार रुपये किमतीच्या म्हशीचा या रानगावच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झालाय तर दुसरी दुधाळ म्हैस जखमी झाली आहे.

या महिन्यात रानगाव्याने शेतकऱ्यांच्या जनावरावर हल्ला करण्याची ही दुसरी दुर्घटना आहे.यापूर्वी 04 जून रोजी कांदलगाव मधील रोहिदास दत्तू ननवरे यांची अडीच वर्षे वयाची म्हैस रानगव्याने ठार केली होती.याच वेळी बाळासाहेब ज्ञानदेव ननवरे यांच्या मोठ्या दुधाळ

 म्हशीला देखील या गव्याने दहा ते बारा ठिकाणी जखमा केल्या होत्या.या घटनेला दोन आठवडे होता येत ना तोच पुन्हा एकदा हिंगणगाव मध्ये युवराज पवार यांच्या गोठ्यावर सतीश खबाले यांच्या म्हशीला या रानगाव्याने हल्ल्यात ठार केले आहे.

इंदापूर वन विभाग आणि पुणे येथील रेस्क्यू टीमने या घटनास्थळी भेट दिली आहे. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून गव्याच्या बंदोबस्तासाठी परवानगी मिळाल्याशिवाय या गाव्याला पकडता येणार नसल्याचं त्यांनी सांगितले आहे.

गेल्या एक-दीड वर्षाहून अधिक काळ या तीनही गावांच्या परिसरामध्ये हा रानगवा वास्तव्य करत असून शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले करत आहे. वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या अंगावर देखील हा गवा धावून येत असल्याचं काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.मात्र अद्याप पर्यंत वन खात्याने या गव्याचा बंदोबस्त केला

 नसून आतापर्यंत अनेक जनावरांना या गव्यापासून गंभीर इजा पोहोचली आहे तर काही जनावरांचा हल्ल्यात मृत्यू देखील झाला आहे. आणखीन किती जनावरांचा बळी घेतल्यानंतर विभागाला जाग येणार असा प्रश्न आता सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जातोय.

Post a Comment

0 Comments