कोळा विद्यामंदिर हायस्कूलमध्ये नवोगतांचे स्वागत व
दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न
कोळा (वार्ताहर शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनि. कॉलेजमध्ये सन 2023 - 24 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते करून मोठ्या उत्साहात करण्यात आली.
प्रशालेत नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर दहावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा संस्थेच्या वतीने
पारितोषिक देऊन प्राचार्य श्रीकांत लांडगे पर्यवेक्षक रफिक मणेरी व इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक विनोद देशमुख यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. दहावी विषय शिक्षकांचा संस्था व शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.
सत्काराला प्रतिउत्तर देताना पालक बजरंग तंडे गुरुजींनी संस्था व सर्व शिक्षकांचे आभार मानले व उत्तरोत्तर अशीच प्रगती शाळेने करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्राचार्य श्रीकांत लांडगे यांनी सर्व यशस्वी
विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले व संस्थेने व पालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले व येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पर्यवेक्षक रफिक मणेरी इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक विनोद देशमुख सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती सरगर व आभार प्रदर्शन प्रभुलिंग तेली यांनी केले.


0 Comments