सांगोला तालुक्यात बी एस एन एलची सेवा विना खंडित द्या :-
अशोक कामटे संघटना बी एस एन एल ने विश्वासार्हता गमावू नये.
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
सांगोला शहर व परिसरात तालुक्यात बी एस एन एल ची सेवा ही 3-4 वर्षापासून सातत्याने खंडितच आहे. त्याकरिता शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने सोलापूर दूरसंचार विभागाचे
जनरल मॅनेजर श्रीकांत राव यांना निवेदन देण्यात आले .तालुक्यात जे बी एस एन एल ग्राहक आहेत त्यांना वारंवार व्यत्यय येत असून त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे
.दरमहा टेलिफोनचे आकारणी रिचार्ज व इतर भाडे ग्राहकांना सुरू आहे . महिन्याकाठी साधारण 15 ते 20 दिवस ही सेवा बंद असते ना फोन लागतात ,ना येतात तसाच प्रकार इंटरनेटच्या बाबतीत
गेल्या दोन ते तीन वर्षापासून सुरू आहे. याबाबतचे अनेक तक्रारी संघटनेकडे आलेले आहेत. अनेक शासकीय व नीम शासकीय कार्यालयात
बी एस एन एल जोडणी आहे त्यामुळे वारंवार सेवा खंडित व विस्कळीत होत आहे , परिणामी सर्वसामान्यांची कामे प्रतीक्षेत पडत आहे.
इतर खाजगी कंपन्यांनी फोर जी, फाईव्ह जी सेवा देणे सुरू केले आहे या शासकीय कंपनीला साधी थ्री जी सेवा देणे ही शक्य होत नाही ही केवढी मोठी शोकांतिका आहे ,
सेवा देणे शक्य नसेल तर जोपर्यंत सातत्याने दर्जेदार व विना खंडित सेवा देणे शक्य नसल्यास ग्राहकांना कोणतीही आकारणी व देयक मागणी करू नये परिणामी ग्राहक आंदोलनाच्या तयारीत आहेत याची दखल न घेतल्यास
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने आपल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल ,या निवेदनाच्या प्रती केंद्रीय दूरसंचारमंत्री भारत सरकार, नई दिल्ली,मा.जिल्हाधिकारिसो , सोलापूर यांनाही देण्यात आलेल्या आहेत.
चौकट:-
शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेचे समस्येचे निवेदन प्राप्त झाले आहे ज्यावेळेस राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते त्यावेळेस टेलिफोनच्या वायर्स या काँक्रीटच्या खाली गेल्या असून त्या जोडण्या कामी महामार्ग विभागाकडून वारंवार व्यत्यय आहे
त्याचबरोबर तांत्रिक अडचणीमुळे सेवा वारंवार खंडित होत आहे याकरिता संबंधित विभागाकडून परवानगी घेऊन येथील जोडणी पूर्ण करून या पुढील काळात विनाखंड सेवा देण्याकरिता आम्ही कटिबद्ध राहू.:-
श्रीकांत राव .जनरल मॅनेजर भारतीय संचार निगम लिमिटेड ,सोलापूर


0 Comments