google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ता. वाकी घेरडी येथे मिरचीची पुड टाकून टोकदार धारदार चाकूने तरुणाचा खून.."याला धरून ठेवा रें; याचा खेळ आज संपवून टाकु च्या मारी."

Breaking News

सांगोला ता. वाकी घेरडी येथे मिरचीची पुड टाकून टोकदार धारदार चाकूने तरुणाचा खून.."याला धरून ठेवा रें; याचा खेळ आज संपवून टाकु च्या मारी."

सांगोला ता. वाकी घेरडी येथे मिरचीची पुड टाकून टोकदार धारदार चाकूने तरुणाचा खून..




तरुणाचा खून.."याला धरून ठेवा रें; याचा खेळ आज संपवून टाकु च्या मारी."

मी वरिल नमुद ठिकाणी माझ्या परिवारासह राहण्यास असुन मी वडीलोपार्जीत शेतात शेती करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. माझ्या परिवारात माझी आई सौ. शारदा केराप्पा लवटे, वय 50 वर्षे, माझे वडील नाव कैराप्पा बलभीम लवटे, वय 55 वर्षं,

 भाऊ नामे रामचंद्र, वय 32 वर्शे, वहीनी नामे सौ. सोनाली, वय 26 वर्शे, तसेच माझी पत्नी नामे सौ. सारिका, वय 21 वर्शे असुन मला तिच्यापासुन मुलगी नामे आयुशी, वय 3 वर्शे व मुलगा नामे आयुश, वय 2 वर्शे असे माझे कुटुंब आहे.

माझा चुलतभाऊ अमोल विश्वास लवटे, वय 23 वर्शे हा माझ्या घराशेजारी त्याची आई गं.भा. जिजाबाई विश्वास लवटे यांच्यासह राहण्यास आहे. आज दि.22/05/2023 रोजी अमोलची मावशी संगीता बापू शिंगाडे ही मुंबईला जात असल्याने

 माझा चुलत भाऊ महेश सोमनाथ लवटे हा दुसरा मावस भाऊ अमोल विश्वास लवटे हयाच्यासह त्याच्याच फॅशन मोटरसायकल क्र. एम. एच. 13 ए.ए. 1978 ने मावशीला गावी जातेवेळी ज्वारी देण्याकरिता वाकी येथुन सांगोल्याला जात असतांना वाकी घेरडी मेन चौकात आज रात्री वेळ अंदाजे 19/45 वा. च्या सुमारास त्याच्या फॅशन मोटरसायकल समोर सांगोला वाकी घेरडी आलेली 

पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्र. एम. एच. 12 सि.आर. 9759 ने भरधाव वेगाने समोरासमोर येवुन मोटरसायकलला कट बसल्यामुळे अमोलची मोटरसायकल रस्त्याच्या खाली गेली त्यामुळे अमोल व इनोव्हा चालक शरद पवार यांच्यात बाचाबाची झाली. 

त्यांच्यात 15-20 मिनीटें वाद झाल्यानंतर सुद्धा त्यांचे आवरत नसल्याने मी व राजू लवटेनी त्या ठिकाणी जावुन त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवाजी पवार यांनी कारच्या खिडकीतुनच अमोलला शिवीगाळी व हाणामारी करत कारमधुन निघण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कार लॉक असल्याने त्यांना बाहेर लवकर येता आले नाही.

 या भांडणामुळे चौकात गर्दी जमली होती. जमलेल्या लोकांनी पण त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. सदरचे भांडण सुरू होते. त्या ठिकाणापासुन हाकेच्या अंतरावर शरद पवार यांचे घर आहे. चौकात भांडण चालु असतांनाच तितक्यात चौकापासुन काही अंतरावर असलेल्या घरी शिवाजी पवार पळत गेला, 

जातांन भारत पवार व शरद पवार यांना सांगुन गेला कि, "याला धरून ठेवा रें; याचा खेळ आज संपवून टाकु च्या मारी." लागलीच त्याच्या घराकडून शरद पवार ची आई सौ. शांताबाई शिवाजी पवार तसेच त्याची आत्या विजूबाई जाधव ह्या दोघी मुठी भरून तिखट घेवून आल्या. त्यांच्यासोबतच शिवाजी पवार हा एका हातात लांब टोकदार धारदार चाकू घेवुन पळत आला. 

त्याच्या डाव्या हातात मिरचीची पुड होती. त्याचवेळी शरद आणि भारत यांनी अमोल यास दोन्ही हातांनी धरून ठेवले होते. शांताबाई व विजुबाई यांनी त्यांच्या हातात आणलेली मिरची ची पुड अमोलच्या तोंडावर टाकली. त्याचवेळी शिवाजी पवार यांनी

त्यांच्या उजव्या हातातील चाकू अमोलच्या डाव्या बरगडीत जोरात खुपसला आणि स्वतःच्या खिश्यातील मिरचीची पुड अमोलच्या अंगावर टाकली. अमोल जोरजोरात ओरडू लागल्याने जमलेले लोक सोडविण्यासाठी पुढे येत असतांना शिवाजी पवार, शांताबाई पवार व विजूबाई जाधव यांनी मिरचीची पुड लोकांच्या अंगावर टाकली.

 अमोलला मोठी जखम होवुन त्याच्या छातीतून रक्त निघू लागल्याने तो खाली जमीनीवर पडला. ती वेळ अंदाजे रात्री 08/30 वा. ची होती. त्यावेळी अमोलला मारहाण करणारे शिवाजी पवार, शरद पवार, भारत पवार, शांताबाई पवार व विजुबाई जाधव हे गर्दीचा फायदा घेवुन त्यांच्या घरी निघुन गेले.

जमलेल्या लोकांच्या मदतीने महेश सोमनाथ लवटे व अजय विभीषण चोपडे दोघे रा. वाकी घेरडी यांनी मोटरसायकलने अमोल यास मध्ये बसवून उपचारासाठी स्पंदन हॉस्पिटल, सांगोला येथे आणले असता, तेथील डॉक्टरांनी अमोल यास तपासुन मृत घोशीत केले.

 महेश व अजय हे अमोल यास उपचारासाठी घेवुन जात असतांना मी व राजु लवटे एका मोटरसायकलवर तसेच राहुल कांबळे व सुनिल लवटे हे एका मोटरसायकलवर असे आम्ही सगळे मिळुन स्पंदन हॉस्पिटल येथे गेलो होतो. डॉक्टरांनी मयत घोशीत केल्यामुळे अमोल ची बॉडी घेवुन पुढील कारवाई कामी ग्रामीण रुग्नालय सांगोला येथे अँब्युलन्स ने गेलो.

सदर प्रकरणातील पवार कुटुंबियातील सर्व लोक व आम्ही जन्मापासून एकाच गावातील रहीवाशी आहोत. आम्ही त्यांना व ते आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो. सदरचा प्रकार हा वाकी घेरडी मेन चौकात रात्री 07/45 वाजल्यापासून 08/30 वा. चे सुमारास घडला असुन सदरचा प्रकार मी व चौकात हजर असणाऱ्या इतर लोकांनी चैकात असलेल्या ग्रामपंचायतीच्या हायमास्टच्या दिव्यात प्रत्यक्ष व स्पष्ट पाहीला आहे.

तरी आज दि. 22/05/2023 रोजी अंदाजे 07/45 वा. च्या सुमारास वाकी घेरडी चौकातुन माझा चुलत भाऊ अमोल विश्वास लवटे हा महेश लवटे सोबत फैशन मो.सा. क्र. एम. एच. 13 एए 1978 वरून मुंबईला जाणाऱ्या मावषीला ज्वारी देण्यास जात असताना समोरून सांगोला ते वाकी घेरडी 

अशी भरधाव वेगात वळणाच्या रस्त्यावरून येणाऱ्या इनोव्हा क्रं. एम. एच. 12 सि.आर. 9759 च्या चालक शरद शिवाजी पवार याने मोटरसायकलला कट मारल्याने मोटरसायकल रस्त्याखाली उतरल्यामुळे मोटरसायकल चालक अमोल लवटे व इनोव्हा चालकात वाद चालु झाला. 

त्याचवेळी शिवाजी पवार इनोव्हा गाडीतून उतरून शरद व भारत यांना अमोल यास धरून ठेवण्यास सांगुन घरी जावून घरून येतांना सोबत शांताबाई व विजूबाई यांना मिरची पुड घेवुन आणि स्वतः लांब टोकदार धारदार चाकू घेवुन आला.

 त्या दोघींनी अमोलच्या डोळयात मिरची पुड टाकली. त्याचवेळी शिवाजी पवार याने अमोलच्या डाव्या बरगडीत चाकू खुपसुन त्यास गंभीर जखमी करून त्याचा खुन केला. त्यामुळे माझी 1) शिवाजी पवार, 2)शरद शिवाजी पवार, 3)भारत शिवाजी पवार, 4) सौ. शांताबाई शिवाजी पवार, 5) विजूबाई जाधव, सर्व

रा. वाकी घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर यांच्याविरूद्ध माझी कायदेशीर फिर्याद आहे. माझी वरिल फिर्याद संगणकावर टंकलिखीत केलेली आहे. माझे सांगीतलेप्रमाणे नोंदविली. प्रिंट काढल्यावर वाचुन पाहीली. माझे सांगीतलेप्रमाणे बरोबर आहे.

Post a Comment

0 Comments