google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी... निवडणूक आयोगाचा नवा फंडा बोटावर शाई लावण्याऐवजी लेझर चिन्हाचा वापर करण्यात येणार

Breaking News

मोठी बातमी... निवडणूक आयोगाचा नवा फंडा बोटावर शाई लावण्याऐवजी लेझर चिन्हाचा वापर करण्यात येणार

मोठी बातमी... निवडणूक आयोगाचा नवा फंडा बोटावर शाई लावण्याऐवजी लेझर चिन्हाचा वापर करण्यात येणार


पुढील काळात पाच राज्यात निवडणुका होणार आहे. या सोबतच लोकसभा निवडणुका देखील होणार आहे. या निवडणुकी दरम्यान बोगस मतदान टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. 

यासाठी नवीन उपाय योजना निवडणूक आयोगातर्फे करण्यात येत आहे. यानुसार मतदान केल्यावर बोटावर शाई लावण्याऐवजी लेझर चिन्हाचा वापर करण्यात येणार असून यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे. 

यासोबतच ईव्हीएम मशीमध्ये एक कॅमेरा देखील लावण्यात येणार असून जो मतदान करताना मतदारांचे फोटो काढणार आहे. दरम्यान, मतदाराने मतदान केले आहे हे पाहण्यासाठी यापूर्वी डाव्या हाताच्या तर्जनी बोटावर निळी शाई लावली जात होती. 

मात्र, ही शाई पुसून पुन्हा बोगस मतदान केले जात होते. मात्र, आता यावर आता नवा उपाय निवडणूक आयोगाने काढला आहे. यासाठी या शाईऐवजी लेझर चिन्हाचा वापर करण्यात येणार असून यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे. 

नखांवर लेझरची खूण केली जाणार आहे. यामुळे पुन्हा मतदानास आल्यास बोगस मतदार पकडला जाईल. यासोबतच ईव्हीएममधील कॅमेरा देखील दुसऱ्यांदा येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून त्याबद्दलचा अलर्ट देणार असल्याने बोगस मतदानाला आळा बसणार आहे.

Post a Comment

0 Comments