google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे मसुरी येथे दि.८ मे ते २ जून या कालावधीत प्रशिक्षण; प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार 'यांच्याकडे'

Breaking News

मोठी बातमी.. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे मसुरी येथे दि.८ मे ते २ जून या कालावधीत प्रशिक्षण; प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार 'यांच्याकडे'

 मोठी बातमी..   सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे मसुरी येथे

दि.८ मे ते २ जून या कालावधीत   प्रशिक्षण; प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार 'यांच्याकडे'

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे ‘आयएएस’च्या प्रशिक्षणासाठी मसुरीला जाणार आहेत. या प्रशिक्षणासाठी राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे.

दि.८ मे ते २ जून या कालावधीत जिल्हा हे प्रशिक्षण होणार आहे.

 दरम्यान या कालावधीसाठी सोलापूरच्या प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.पदभार देण्याची ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

 मसुरी येथील लालबहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये ८ मे ते २ जून या कालावधीत चौथ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी देशभरातील आयएएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून १८ आयएएस अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे दोन वेळा मसुरी येथे आयएएस प्रशिक्षणासाठी गेले होते.

प्रशासनातील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी या दोन्ही अधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची आगामी काळात बदली होऊ शकते, अशी शक्यता व चर्चा असताना जिल्हाधिकारी शंभरकर हे प्रशिक्षणासाठी मसुरीला जात आहेत.

येत्या काळात जिल्ह्याच्या प्रशासनात काही महत्वाच्या घडामोडी घडतात का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments