google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला राजकारणात जनतेशी,पक्षाशी व विचारांशी निष्ठा गरजेची ; डॉ. बाबासाहेब देशमुख

Breaking News

सांगोला राजकारणात जनतेशी,पक्षाशी व विचारांशी निष्ठा गरजेची ; डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला राजकारणात जनतेशी,

पक्षाशी व विचारांशी निष्ठा गरजेची ; डॉ. बाबासाहेब देशमुख

राजकारण हे समाजकारणाचे महत्वाचे साधन आहे. लोकांचा सर्वागीण विकास साधायचा आसेल तर तो राजकारणाच्या माध्यमातून साधता येतो. 

त्यासाठी राजकारणाची वाटचाल करीत असताना जनतेशी, पक्षाशी व विचारांशी निष्ठा बाळगणे गरजेचे आहे.

 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे तात्कालील आमदार ज्यांनी ११ वेळा सांगोला मतदार संघाचे नेतृत्व केले आसे स्व.गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांनी राजकारणाकडे समाजकारण करण्याच्या हेतुने बघत राजकारण केले.

 व आयुष्यभर जनतेशी,पक्षाशी व विचारांशी निष्ठा कायम जपली असल्याचे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले.

जनतेशी, पक्षाशी व विचारांशी निष्ठा जपणे जरी कठीण आसले तरी जनहिताच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठा गरजेची आहे..

 जनतेशी निष्ठा कायम ठेवायची असेल तर जनतेशी विश्वासहर्तेने राहीले पाहिजे. कारण राजकारणामध्ये विश्वासाहर्तेला असाधारण महत्त्व आहे.

सध्या राजकारणाचे स्वरूप बदलले असले तरीही विश्वासहर्ता, निष्ठा या गोष्टी गरजेच्या आहेत.कारण राजकारण करीत असताना आपला जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न असतो

 तो विकास साधत असताना निस्वार्थपणे काम करावे लागते.. तरच जनतेचा विश्वास कायम टिकुन राहतो. म्हणुनतरी राजकारणामध्ये जनतेशी निष्ठा कायम राहीली पाहीजे.

तसेच प्रत्येक नेत्यांना राजकारणामध्ये काम करीत असताना कुठल्यातरी पक्षांच्या. संघटनेच्या माध्यमातून किंवा त्या पक्षात राहुनच काम करावे लागते.

 मग त्या पक्षांमध्ये काम करीत असताना पक्षावरील निष्ठा कायम जपली पाहिजे. कारण पक्ष म्हणजे समाजाच्या विकासासाठी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी.

व समाजहितासाठी एकत्रीत येऊन निर्माण केलेले संघटन म्हणजे पक्ष, मग आपण आशा समाजहितासाठी एखाद्या पक्षात काम करीत असलो व पक्ष म्हणजे एक कुटुंब आहे व आपण त्या कुटुंबाचे सदस्य आहोत 

तर मग आपण आपल्या कुटुंबाशी म्हणजे पक्षाशी निष्ठेने वागले पाहिजे. पक्षाशी विश्वासघात न करता निष्ठेने राहीले पाहिजे. स्व आबासाहेबांनी आयुष्यभर पक्षाशी फारकत घेतली नाही.

सत्तेच्या हव्यासापोटी व स्वार्थासाठी पक्षाशी अविश्वासाने वागले नाहीत. आयुष्यभर पक्षाशी निष्ठा जपली. राजकारणातुन समाजकारण करीत असताना विचार धारा सुध्दा अंगी बाळगणे गरजेचे आहे.

आपण ज्या संघटनेत, पक्षांमध्ये काम करीत असतो त्या पक्षाची एक स्वतंत्र विचारधारा असते. ती विचारधारा अंगिकारली तरच पक्षाला व नेते कार्यकर्ते यांना प्रतिष्ठा प्राप्त होते. 

कारण विचारधारा ही एक अशी गोष्ट आहे की विचारधारेचा एकदाका पगडा मनावर बसला. ती विचारधारा एकदाका आपण स्विकारली तर पक्ष, संघटना मजबुत होते. 

व त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून आपण लोकाचे प्रश्न सोडवु शकता. विकासाची कामे करु शकता. आपले आदर्श स्व आबासाहेबांनी आयुष्यभर विचारधारेशी तडजोड केली नाही.

 पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन आबासाहेबांनी राजकारणातच्या माध्यमातून समाजकारण केले. विचार धारेवरती काम करणे सुध्दा अवघड गोष्ट आहे.

 विचारधारा बाळगायची म्हटले व त्या वरती मार्गक्रमण करायचे म्हटले की निस्वार्थपणे काम करावे लागते . हेच काम आबासाहेबांनी आयुष्यभर केले. व विकासाचा पुरोगामी विचारधारेचा ही विकास करुन दाखवला.

आम्ही सर्व शेतकरी कामगार पक्षाचे नेते कार्यकर्ते हे आबासाहेबांनी घालुन दिलेल्या आचार-विचारांवरती काम करीत आहोत. 

म्हणुनतरी आजही राजकारणाचे स्वरूप बदलले असले तरी आबासाहेबांनी तयार केलेले नेते कार्यकर्ते जनतेशी,पक्षाशी. व विचारधारेशी निष्ठा बाळगुन आहेत, असेही शेवटी डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले.

Post a Comment

0 Comments