सांगोल्यात वाळू माफीयांनी तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेला टिपर, जेसीबी पळविला
सांगोला :- (शब्दरेखा एक्सप्रेस न्युज) महसूल विभागाच्या पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारी पकडलेली दोन टिपर व एक जेसीबी अशी दहा लाख रुपये किंमतीची तीन वाहने वाळू
माफियांनी तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिपाई शामराव कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरात विनापरवाना वाळू वाहतूक करताना पकडलेली अनेक वाहने शासकीय धान्य गोडावून मधून पळवून नेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे महसूल विभागाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे वाळू माफियांची हिम्मत पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या वाळू माफियांवर वचक बसविण्यासाठी महसूल प्रशासन काय भूमिका घेणार ? याकडे लक्ष लागले आहे.
" वाळू वाहतूक करणारी अनेक वाहने महसूल विभागाकडून पकडली जातात परंतु महसूलच्या ताब्यातील असलेली वाहने अज्ञात व्यक्तीकडून पळविले जातात
या घटनेस नेमकं जबाबदार कोण ? तहसीलदार की वाळूमाफिया ! अशी उलट सुलट चर्चा नागरिकातून होत आहे चोरीस गेलेले दोन टिप्पर एक जेसीपी यांचे मालक महसूल विभागावर गुन्हा दाखल करणार की सोडून देणार याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण येत आहे "
अवैधरित्या गौण खनिज वाळू वाहतुक व उत्खनन रोखण्यासाठी या कार्यालयाच्या भरारी पथकाने अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारी वाहने पकडली होती.
तलाठी कुमार रवी राजवाडे यांनी अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा अनिल धारेकर रा. सांगोला याचे मालकीचा एम.एच.१३ डी. क्यू. ५२२८ हा टिपर पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात उभा केला होता.
तसेच दत्तात्रय टकले यांचे मालकीचा एम. एच.०४ - ०८९१ हा टिपर आणि रमेश फुले यांचे मालकीचा विना नंबरचा जेसीबी अशी तीन वाहने पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात उभी केली होती.
दरम्यान शिपाई राजाराम कोकरे शिपाई हे १४ एप्रिल रोजी सकाळी नऊच्या सुमारास तहसील कार्यालयात ड्युटीवर आले असता त्यांना कार्यालयातील बांधकामाचा कठडा तुटलेला दिसला.
कार्यालयाच्या आवारात उभा केलेला टिपर नंबर एम. एच. १३ डी. क्यू. ५२२८ हा बांधकामाचा कठडा तोडून पळवून नेला. तसेच शासकीय गोडावून येथे लावण्यात आलेला टिपर व जेसीबी अज्ञात इसमाने पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
महसूल विभागाच्या पथकाने गेल्या वर्षभरात विनापरवाना वाळू वाहतूक करताना पकडलेली अनेक वाहने शासकीय धान्य गोडावून मधून पळवून नेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे महसूल विभागाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले


0 Comments