सोलापूर- मंगळवेढा उपविभागीय कार्यालयातील
"त्या" लाचखोर तलाठ्याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला !
सांगोला तालुका/ प्रतिनिधी ; कमलापूर ता. सांगोला येथील शेतकऱ्यास राष्ट्रीय महामार्गसाठी संपादीत क्षेत्रात बाधीत झालेल्या पाईपलाईनची नुकसान भरपाई देण्याकरिता लाचेची मागणी
करून तडजोडीअंती ७ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी मंगळवेढा कार्यालयातील तलाठी सुरज रंगनाथ नळे रा.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि सोलापूर
व खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण रा. शेलेवाडी ता. मंगळवेढा जि.सोलापुर यांना सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. २९ मार्च २०२३ रोजी मंगळवेढा येथे अटक केली होती.
त्यानंतर आरोपी सुरज रंगनाथ नळे यांने पंढरपूर येथील मे.जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
पंढरपूर येथील मे. जिल्हा सत्र न्यायालयाने मुळ फिर्यादीचे व सरकार पक्षाचे म्हणणे मान्य करुन आरोपीचा जामीन अर्ज दि. १८ एप्रिल रोजी फेटाळून लावला.
यात मूळ फिर्यादीतर्फ ॲड.दिपक मदने ॲड. सुहास कदम ॲड. विजय बेंदगुडे ॲड.सुमित साळुंखे ॲड.शक्तिमान माने
ॲड.अमोल आवताडे यांनी तर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. सारंग वांगीकर यांनी आरोपीतर्फे ॲड.निलेश जोशी यांनी काम पाहिले.


0 Comments