google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला किडबिसरीचे डॉलर दादा कोळेकर यांचा पोलीस प्रशासनाकडून सन्मान

Breaking News

सांगोला किडबिसरीचे डॉलर दादा कोळेकर यांचा पोलीस प्रशासनाकडून सन्मान

सांगोला किडबिसरीचे डॉलर दादा कोळेकर यांचा पोलीस प्रशासनाकडून सन्मान

कोळा (वार्ताहर शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क):- सांगोला तालुक्यातील किडबिसरीचे सुपुत्र सध्या आटपाडी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले डॉलर दादा कोळेकर यांनी पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल

 सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करून गौरव करण्यात आला. या कामगिरीचे किडबिसरी ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

डॉलर कोळेकर आटपाडी पोलीस स्टेशनला त्यांचे उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचे काम सुरूआहे अनेक गुन्हामध्ये अतिशय धाडसाने व कौशल्यपूर्ण उघडकीस आणलेला आहे. या कामगिरीबद्दल पोलिस प्रशासनान दखल

 घेऊन आपणास सन्मानीत करून आपण भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्टपणे कर्तव्य बजावून कामगिरी कराल अशी अपेक्षा आहे. असे प्रशस्तीपत्रक पत्र देण्यात आले त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments