google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आघाडीने फोडला प्रचाराचा नारळ

Breaking News

सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आघाडीने फोडला प्रचाराचा नारळ

 सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आघाडीने फोडला प्रचाराचा नारळ

सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पॅनल विरोधात स्व. भाई गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडीने अंबिकादेवी मंदिरात अक्षय तृतीया, रमजान ईदच्या मुहूर्तावर प्रचाराचा नारळ फोडला.

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी शेकापने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या 

आजी-माजी आमदार यांच्या पक्षांबरोबर आघाडी करून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. परंतु या प्रमुख पक्ष्यांच्या नेते मंडळींच्या विरोधात शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, 

आरपीआय, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशा विविध पक्षातील नेतेमंडळीएकवटून स्व. भाई गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडीची स्थापना केली. 

प्रचाराच्या शुभारंभनंतर सर्वांनी सांगोला येथील सूतगिरणीवर स्व. गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले.

या प्रचार शुभारंभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, परिवर्तन आघाडीचे पॅनल प्रमुख सचिन देशमुख, उद्धव बाळासाहेब ठाक शिवसेनेचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण हाके, 

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, गोरख यजगर जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, आरपीआयचे सुरज बनसोडे, विक्रम शेळके, तोहीद मुल्ला,शंकर मेटकरी इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments