google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तिप्पेहळी येथे नूतन आमदार रवींद्र धंगेकर व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची सस्नेह भेट विशेष बातमी...

Breaking News

तिप्पेहळी येथे नूतन आमदार रवींद्र धंगेकर व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची सस्नेह भेट विशेष बातमी...

 तिप्पेहळी येथे नूतन आमदार रवींद्र धंगेकर व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची सस्नेह भेट विशेष बातमी...

इंजि. अशोक नरळे (फलटणे) परिवाराचे जिव्हाळ्याचे संबंध - आ. धंगेकर तिप्पेहळी येथे आ. रविंद्र धंगेकर यांचा सत्कार संपन्न

कोळा (वार्ताहर शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज):- तिप्पेहळी गावचे सुपुत्र, रामा फलटणे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, आमचे नातेवाईक मित्र, पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती इंजिनियर 

अशोक नरळे- फलटणे परिवाराचे माझे बन्याच वर्षापासून जिव्हाळ्याचे संबंध असून फलटणे परिवाराच्या वतीने सत्कार स्वीकारताना आनंद होत आहे, असे मत कसबा-पुणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.

तिप्पेहळी, ता सांगोला येथे रामा फलटणे फार्म हाऊस वर आमदार धंगेकर यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी सरपंच बाबासो नरळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानाचा फेटा देऊन सत्कार संपन्न झाला. बावेळी सर्व नेतेमंडळी व मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, ग्रामीण भागातून व पुणे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये उद्योग ब सामाजिक क्षेत्रात अशोक नरळे यांनी मोठे नाव कमावले आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये केलेल्या विकासात्मक व नाविन्यपुर्ण पर्यटन स्थळाचे विशेष कौतुक वाटले असे धंगेकर म्हणाले. 

त्यांच्या मातोश्रीयांचे आशीर्वाद घेऊन, त्यांचे भाऊ व सर्व नातेवाईक यांना भेटून मला आनंद झाला आहे. पुढील काळात इंजिनिअर अशोक नरळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे मत धंगेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, इंजिनिअर अशोक आबा नरळे यांच्यामुळे आ. रवींद्र धंगेकर यांच्या भेटीचा योग आला व माझ्या हस्ते सत्कार झाला हे माझे भाग्य समजतो.

 रामा फलटणे ट्रस्टचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिबांना नेहमी मदत व सहकार्य करण्याचे काम केले आहे, असे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शेवटी सांगितले.

या कार्यक्रमास सरपंच अरुण बापू बजवळकर, पत्रकार जगदिश कुलकर्णी, पोलीस पाटील राजू करांडे, डेअरी मॅनेजर पांडुरंग नरळे,विलास नरळे, पैलवान काळेल, उद्योगपती परमेश्वर खांडेकर. नगरसेवक नवनाथ रानगट, श्री संजय कदम (मिरज), शिवाजी बापू घेरडे, भगवान वस्ताद, 

इंजी विष्णु सांगोलकर, प्रोफे. काळेल, सचिन नरळे, ओम नरळे, सचिव अविनाश करचे रवींद्र होळकर, अध्यक्ष तुकाराम बजबळकर, सरपंच गजानन हिप्परकर, आटपाडीतालुका अध्यक्ष श्री पाटिल, कारंडे मिस्री, प्रोफे दत्ता नरळे, 

संजय काळेल, करांडे सर, अलका कांडे मॅडम, वृषभ करांडे, इंजी. भूषण गोडसे, श्रीमंत अण्णा बजवळकर, डॉ संतोष नरळे, दिलीपहिप्परकर, विस्वास कुटे, ईश्वर बजवळकर, युवा नेते संतोष कराडे, 

फंटू बजवळकर, चोपदार दत्ता नरळे, सामाजिक कार्यकर्ते समाधान बोबडे पांडुरंग नामदेव नरळे, मठाचे अपेक्ष गोडसे, विष्णु नरळे, शिवाजी खांडेकर, किसन नरळे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक कार्यकारी सोसायटी बिलास नरळे (तात्या), ओम नरळे, अथर्व नरळे, सौ. शांता कुटे, सौ बयाबाई करांडे, शिक्षिका सौ अलका करांडे, मंगल नरळे यांच्यासह नरळे-फलटणे परिवाराने परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments