सबसे कातील गौतमी पाटीलच्या घुंगरु चित्रपटाचा टिझर प्रदर्शित
सबसे कातील गौतमी पाटील आपल्या डान्समुळे ओळखली जाते. आपल्या डान्सच्या जोरावर तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते.
नुकताच तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.
गौतमी पाटीलने घुंगरू या सिनेमात काम केलं आहे. हा तिचा पहिलावहिला सिनेमा आहे. या सिनेमातून ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येणार आहे.
या सिनेमाचा टिझर लॉन्च झाला आहे. घुंगरू चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रासह परराज्यात आणि सोलापूर जिल्ह्यातही झालं आहे. लोककलावंताच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. बाबा गायकवाड यांनी हा सिनेमा दिगदर्शित केला आहे.
या सिनेमात गौतमी पाटीलची प्रमुख भूमिका आहे. येत्या महिन्याभरात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. गौतमीचा हा पहिलाच चित्रपट असल्याने तिच्यासह तिच्या चाहत्यांना त्याची उत्सुकता लागली आहे. चित्रपटात गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे.
गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिचं मनोगत व्यक्त केलं आहे. घुंगरू हा चित्रपट कलाकारांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांना आवडेल, असं गौतमीने म्हटले आहे.
लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील ही सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामुळे चर्चेत असते. गौतमी आज एक स्टार आहे. तिचे लाखो चाहते असून तिला पाहण्यासाठी खूप गर्दी करतात.
बऱ्याचवेळा तिला या गर्दीतून वाचवण्यासाठी बाऊंसर्सची गरज भासत असते. आता चाहत्यांना तिच्या चित्रपटाची उत्सुकता असणार आहे.


0 Comments