सांगोला विद्यामंदिर येथे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाची आज सांगता
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज):-
सांगोला येथील राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाची सांगता आज रविवार दि. १० एप्रिल २०२३ रोजी
ग. दि. माडगुळकर साहित्य नगरी, सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे दुपारी २ वाजता होणार असाल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी दिली.
दुपारी २ वाजता साहित्य संमेलनाचा समारोप व गौरव समारंभ संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी इंद्रजित भालेराव भुषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना. दिपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी किशोर कदम, आ. शहाजीबापू पाटील, आ. समाधान आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील उपस्थितराहणार आहेत.
यावेळी डॉ. द. ता. भोसले, योगिराज वाघमारे, भास्कर चंदनशिवे,डॉ. कृष्णा इंगोले यांचा गौरव होणार आहे.
संमेलनाच्या तिसऱ्या व अखेर दिवशी सकाळी ९.३० ते ११.३० वाजेपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि साहित्य याविषयावर परिसंवाद होणार आहे.
अध्यक्षस्थान डॉ. महेश कदम भूषविणार असून दत्ता घोलप, रफिक सूरज, अंकुश पडवळे यांचा सहभाग असणार आहे. सीताराम सावंत संवादक असणार आहेत.
सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत चित्रपट अभिनेते व कवी किशोर कदम यांची मुलाखत होणार आहेत. संवादक म्हणून युवराज मोहिते, महेंद्र महाजन उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत संगीतकार प्रशांत मोरे यांचा आई एक महाकाव्य कार्यक्रम होणार आहे. इंद्रजित घुले संवादक असणार आहेत.
0 Comments