धक्कादायक घटना.. वाट्स अपवर स्टेटस ठेवून स्वतः लाच वाहिली श्रद्धांजली अन् केली आत्महत्या
जत तालुक्यातील या गावातील धक्कादायक घटना.
जत:- स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहत एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे.
ही घटना जत तालुक्यातील येळवी गावात घडली आहे. गेल्या दाेन महिन्यांत समाज माध्यमातून स्वत:लाच श्रद्धांजली अर्पण करुन आत्महत्या करण्याचा हा दूसरा प्रकार असल्याची सांगली जिल्ह्यात चर्चा आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील येळवी येथे २२ वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो टाकत भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातील घरी घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
येळवी येथील २२ वर्षीय औदुंबर विजय जगताप याचे घर येळवी गावापासून काही अंतरावर आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता औदुंबर जगताप याने स्वतःच्या व्हॉट्सअपला स्वतःचा फोटो स्टेटसला ठेवला.
स्टेटस ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याने राहत्या घरी आत्महत्या केली. या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.
0 Comments