सांगोला आदेश आला लागा तयारीला गुलाल आपलाच ! डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या लागा
तयारीला या टेटस मूळे तालुक्यात धूमाकूळ!
सांगोला / प्रतिनिधी आदेश आला लागा तयारीला गुलाल आपलाच डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या या व्हाट्सअप स्टेटस मुळे सांगोला तालुक्यामध्ये धुमाकूळ तालुक्यातील तमाम
शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, शेकाप प्रेमी यांच्या व्हाट्सअप स्टेटस वर एकच रिंगटोन विजयी होणार निवडून येणार होऊ द्या कितीही काय? विजयी होणार निवडून येणार होऊद्या कितीबी काय ?
यंदा गुलाल आपलाच हाय या गाण्याने तालुका सोशल मीडिया बरती शेकापमय होऊन गेला. यावरून शेतकरी कामगार पक्ष हा सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ पैकी १८ जागांवर स्वार लढणारा असल्याचे जवळपास संकेत स्पष्ट झालेले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष कोणता नेता प्रवल दावेदार उरणार यावरती बाजार समितीची निवडणूक जाहीर
झाल्यापासून चर्चा सुरू आहे परंतु अचानकच शेकापचे नेते प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी १० एप्रिल रोजी तालुक्यातील जनतेला व्हाट्सअप ला स्टेटस ठेवून लागा
तयारीला असा संदेश दिल्याने मात्र सांगोला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यामध्ये मोठी उत्सुकता दिसून आली.
कारण सांगोला तालुक्यातील बहुतांश निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीवरती शेतकरी कामगार पक्षाचे झेंड फडकलेले आहेत व त्यांची सत्ता ग्रामपंचायत मध्ये दिसून येत आहे
व तसे पाहिले असता गेल्या आमदारकीमध्ये ७७६ मताने शेतकरी कामगार पक्षाचे आमदार पदाचे उमेदवार यांनी बिजयाला गवसणी घालता आली नाही. परंतु प्रथमच एवढ्या मोठ्या मताधिक्याने अगदी थोडयाशा मताने आमदारकीची बाजी मारता न आली म्हणून काय झाले
याचाबदला मात्र येणाय्या आमदारकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष घेणार असल्याचे वातावरण सांगोला तालुक्यातील अगदी खेडोपाडी प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीमध्ये शहरांमध्ये आपणास पाहावयास मिळते.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मताने आज शेतकरी कामगार पक्ष सांगोला तालुक्यामध्ये काम करत आहे व तशा पद्धतीने यश येताना दिसत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची चर्चा रंगत असतानाच
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी निवडणुकीच्या जोराने कामाला लागा असा व्हाट्सअप स्टेटस द्वारे तालुक्यातील आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकत्यांना संदेश दिला आहे.त्यामुळे आता शेतकरी कामगार पक्ष सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ पैकी
१८ जागा स्वबळावरनिवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे असे स्पष्ट झाले आहे की शेतकरी कामगार पक्ष सांगोला तालुक्यातील कोणत्याही पक्षाची युती करणार नाही.
त्यामुळे आता लागा तयारीला या डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या व्हाट्सअप स्टेटस मुळे मात्र सांगोला तालुक्यामध्येधुमाकूळ घातला आहे.
त्यामुळे सांगोला तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी, बाळासाहेबांची शिवसेना, कांग्रेस भाजप आरपीआय नेमके कोणत्या पक्षाचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकणार याकडे तालुक्यातील तमाम जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.


0 Comments