google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज: ठाकरे गटाच्या 2 मोठ्या नेत्यांचा गाडी अपघातात मृत्यू; वज्रमूठ सभेला जाताना दुर्घटना

Breaking News

ब्रेकिंग न्यूज: ठाकरे गटाच्या 2 मोठ्या नेत्यांचा गाडी अपघातात मृत्यू; वज्रमूठ सभेला जाताना दुर्घटना

ब्रेकिंग न्यूज: ठाकरे गटाच्या 2 मोठ्या नेत्यांचा गाडी अपघातात मृत्यू; वज्रमूठ सभेला जाताना दुर्घटना 

 शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांचा गाडी अपघातात मृत्यू झाला आहे.

 नागपूर येथे 16 एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेसाठी जात असताना हा अपघात झाला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महाविकास आघाडीच्या नागपूर येथील वज्रमूठ या सभेसाठी जाताना अमरावती जवळ दहिसर विधानसभेचे उपविधानसभा समन्वयक अतुल तावडे आणि राजू शिंदे यांचे दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली असे ट्विट करत म्हात्रे यांनी शोक व्यक्त केला आहे. 

मुंबईहून नागपूरला जाताना हा समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला आहे. यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेऊन तात्काळ दाखल

 घेतली. शिंदे यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून जखमी कार्यकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे तसेच या सर्व जखमी कार्यकर्त्यांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments