google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला रेल्वे थांब्यासाठी 11 हजार पोस्ट कार्ड पाठवली कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी रेल्वे थांब्यासाठी अशोक कामटे संघटनेचे अभियान

Breaking News

सांगोला रेल्वे थांब्यासाठी 11 हजार पोस्ट कार्ड पाठवली कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी रेल्वे थांब्यासाठी अशोक कामटे संघटनेचे अभियान

 सांगोला रेल्वे थांब्यासाठी 11 हजार पोस्ट कार्ड पाठवली

कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी रेल्वे थांब्यासाठी अशोक कामटे संघटनेचे अभियान

सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

कलबुर्गी -कोल्हापूर -कलबुर्गी या रेल्वेस सांगोला येथे रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी अकरा हजार पोस्ट कार्ड पाठवण्याचा 

अभियान सोलापूर येथील विभागीय पोस्ट कार्यालय सोलापूर येथे शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या कार्यालयात करण्यात आला.

 ही पत्रे रेल्वेमंत्री भारत सरकार ,रेल्वे राज्यमंत्री , खासदार ,महाव्यवस्थापक मुंबई यांना पाठवण्यात आली आहे .अभियानाच्या टप्प्यात सोमवारी सुमारे 11000 पोस्ट कार्डे पाठविण्यात आली.

 सांगोला रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन हे शहर मिरज -कुर्डूवाडी लोहमार्गावरील महत्वाचे शहर आहे. शहरातून अनेक मोठे राष्ट्रीय राज्य महामार्गावरील महत्त्वाचे शहर आहे.

 या शहरात मोठी बाजारपेठ असल्याने तालुक्यातील व इतर जिल्ह्यातून परिसरातील नागरिक शहरात सतत ये -जा करीत असतात 

त्यांच्या सोयीसाठी 22155 & 22156 कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी येथे रेल्वे थांबा असणे आवश्यक आहे. या आशयाची पत्रे पंढरपूर, कुर्डूवाडी, सोलापूर शहर व सांगोला तालुक्यातील नागरिकांनी या समर्थनात पत्रे पाठवले आहेत.

Post a Comment

0 Comments