google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरातील अनाधिकृत अतिक्रमणे सरसकट काढावी अन्यथा मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांचे 1 मे 2023 रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

Breaking News

सांगोला शहरातील अनाधिकृत अतिक्रमणे सरसकट काढावी अन्यथा मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांचे 1 मे 2023 रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

 सांगोला शहरातील अनाधिकृत अतिक्रमणे सरसकट काढावी अन्यथा

मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांचे 1 मे 2023 रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

सांगोला/ सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी सांगोला शहरात रस्त्यावर शासकीय जागेवरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने शहरामध्ये वाहतूक कोंडी होत आहे.

 यामुळे सांगोला शहरातील अनेक नागरिकांना याचा त्रास होत असून सर्वसामान्य,वंचित,दुर्बल अशा सर्वसमावेशक घटकांची गळचेपी यामध्ये होत आहे.

गोरगरीब जनतेवर काही प्रस्थापित राजकारणी सूडबुद्धीने अन्याय करीत असून हे अतिक्रमणे तात्काळ सरसकट काढून घेण्यासाठी मा. नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील निवेदन सादर केले

 असून महाराष्ट्र दिन व कामगार दिना यादिवशी सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे.

यामुळे शहरातील एखतपूर रोड, महुद रोड, चिंचोली रोड,अहिल्यादेवी होळकर चौक,अंबिका देवी मंदिरा समोरील परीसर, विद्यामंदीर प्रशाला तसेच जुनी भाजी मंडई, नवी भाजी मंडई, महात्मा फुले चौक,

 शिवाजी महाराज चौक, आण्णा भाऊ साठे चौक, तहसील कार्यालया समोरील आवार, वाढेगाव नाका, कडलास नाका, तसेच नगरपालिके समोरील स्टेशन रोड, मिरज रोड पाण्याच्या टाकीपासून ते पंढरपूर रोड शहराच्या हदीपर्यंत,

नगरपालिकेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात टप-या दुकाने, हातगाडे, यांनी अतिक्रमण केलेले आहे. व्यापारी यांनी 10 x 15 चे गाळे घवून समोर 15 ते 20 फुटाचे अतिक्रमण करुन शासकीय जागा लाटण्याचा प्रकार केलेला आहे.

सदर टप-या तात्काळ काढाव्यात प्रशासनांने काही मोजकीच अतिक्रमणे काढून गोर गरिबांवरती अन्याय न करता सांगोला शहरातील सर्वच अनाधिकृत अतिक्रमणे कोणताही दुजाभाव न करता सरसकट अतिक्रमणे काढावीत. 

अन्यथा 1 मे 2023 रोजी नागरीकांसह तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे  मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments