google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला परिवर्तन फाऊंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींना मार्गदर्शन

Breaking News

सांगोला परिवर्तन फाऊंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींना मार्गदर्शन

सांगोला परिवर्तन फाऊंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींना मार्गदर्शन

सांगोला (प्रतिनिधी): नेहमीच मुली व महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सांगोल्यातील परिवर्तन फाऊंडेशन या संस्थेतर्फे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त रयत इंग्लिश मिडीयम स्कूल दहिवडी, ता. माण (जि. सातारा) येथे स. ८ ते १० या वेळेत प्रशालेतील इ. ४ ते ९ वीच्या मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थाध्यक्ष कु. ओंकार सुभाष साळुंखे यांनी महिलांसाठीचे कायदे, मासिक पाळी व आरोग्य, ऑनलाईन फसवणूक, प्रेमातील फसवणुक, मुलींचे शिक्षण व लग्न, सेल्फ डिफेन्स इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच परिवर्तन फाऊंडेशन माण तालुकाध्यक्षा कु. सुप्रिया वीरकर यांनी मासिक पाळी संबंधी मार्गदर्शन केले

 यासाठी कु. समीक्षा साळवी व कु. पुजा फापाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे वेळी प्रशालेतील मुलींच्या समस्या जाणून घेऊन कोणत्याही अडचणीत संस्थेकडून तुम्हाला योग्य ती मदत पुरवली जाईल असे आश्वासन संस्थाध्यक्षांनी उपस्थित विद्यार्थिनींना दिले.

 संस्थाध्यक्षांनी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बोलावल्या बद्दल प्रशालेचे आभार मानले व सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील सर्वांनी पुन्हा प्रशलेस भेट द्यावी अशी सदिच्छा व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.

 यावेळी परिवर्तन फाऊंडेशन चे संस्थाध्यक्ष कु. ओंकार साळुंखे, माण तालुकाध्यक्षा सुप्रिया वीरकर, प्रशालेच्या प्राचार्या जाधव मॅडम, प्रियांका मॅडम, येळे मॅडम, सर्व महिला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments