google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ता. प्राथमिक आरोग्य केंद्र महुद येथे जागतिक महिला दिनानिमित्त लाईफ कोच सचिन मागाडे यांचा डियर जिंदगी कार्यक्रम संपन्न

Breaking News

सांगोला ता. प्राथमिक आरोग्य केंद्र महुद येथे जागतिक महिला दिनानिमित्त लाईफ कोच सचिन मागाडे यांचा डियर जिंदगी कार्यक्रम संपन्न

सांगोला ता. प्राथमिक आरोग्य केंद्र महुद येथे जागतिक महिला दिनानिमित्त लाईफ कोच सचिन मागाडे यांचा डियर जिंदगी कार्यक्रम संपन्न

सांगोला (प्रतिनिधी): बुधवार, दि. 08 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री. मिलिंद सावंत विस्तार अधिकारी (आरोग्य) पंचायत समिती, सांगोला यांच्या संकल्पनेतून

 प्रा. आ. केंद्र महुद येथे सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी ताण तणावाचे व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शनपर  डियर जिंदगी हा कार्यक्रम डॉ. अविनाश खांडेकर, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र महुद यांनी आयोजित केला होता. 

यामध्ये लाईफ कोच सचिन मागाडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना अगदी सोप्या भाषेत ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे व सकारात्मक कसे राहावे याबद्दल अतिशय उत्तमपणे मार्गदर्शन केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. मिलिंद सावंत विस्तार अधिकारी (आरोग्य) पंचायत समिती, सांगोला यांनी असे कार्यक्रम सांगोला तालुक्यातील सर्व प्रा. आ. केंद्रांवर आयोजित करायला हवेत ज्यामुळे सर्वांचे मानसिक आरोग्य अधिक सदृढ होईल तसेच डियर जिंदगी या कार्यक्रमाचा कुटुंबातील प्रत्येकाने एकदातरी आस्वाद घ्यावा असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments