google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेकाप पक्षात भुकंप कधीच होत नसतो.शेकाप पक्ष हा अथांग सागरासारखा शांत,संयमी व विचारधारा जतन करणारा पक्ष-- अॕड धनंजय मेटकरी

Breaking News

शेकाप पक्षात भुकंप कधीच होत नसतो.शेकाप पक्ष हा अथांग सागरासारखा शांत,संयमी व विचारधारा जतन करणारा पक्ष-- अॕड धनंजय मेटकरी

 शेकाप पक्षात भुकंप कधीच होत नसतो.शेकाप पक्ष हा अथांग सागरासारखा शांत,संयमी व विचारधारा जतन करणारा पक्ष-- अॕड धनंजय मेटकरी

स्व. आबासाहेबांच्या दुःखद निधनानंतर काही नेते पक्षात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करीत आहेत.

सांगोला प्रतिनिधी  स्व आबासाहेबांचे‌ दुःखद निधन झाले व सांगोला विधानसभा मतदार संघातील जनतेला एकाकी पडल्याची भावना निर्माण झाली.लोकांना येणारा काळ आपल्यासाठी कसा आसेल‌ यांची चिंता वाटु लागली..अशातच डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी राजकारणात पदार्पण केले व जेष्ठ नेते चंद्रकांत (दादा) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व अनेक जुन्या जाणत्या नेत्यांच्या सल्ल्याने समाजकार्याची धूरा वाहण्यास सुरुवात केली.

   डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांचा जनसंपर्क एवढा वाढला की,गावोगावचे तरुण त्यांना जोडले गेले . डॉ बाबासाहेब देशमुख हे सुद्धा प्रत्येकांच्या सुख दुःखात सहभागी होऊ लागले..अशातच त्यांच्यावरती  पुरोगामी युवक संघटनेची राज्याची जबाबदारी टाकण्यात आली.व‌ नंतर काही दिवसांनी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बाॕडीवरती संचालक म्हणून संधि मीळाली.

आणी मग काय डॉ बाबासाहेब देशमुख हे  गाव नी गाव व‌ वाड्या वस्त्या पिंजुन काढत  आहेत.काही महत्वपूर्ण कार्यक्रमास जेष्ठ नेते भाई चंद्रकांत (दादा) सुध्दा सहभागी होऊन मार्गदर्शन करीत असताना.व‌  पक्षामध्ये चांगले वातावरण निर्माण झाले असताना काही नेते विरोधी पक्षाच्या साथीने आपल्याच पक्षात संभ्रम निर्माण करीत आहेत.

  जे लोक संभ्रम निर्माण करतात तेच लोक उलट पक्षी पक्षाच्या हिताच्या पोकळ गप्पा मारत आहेत.आंम्ही किती निष्ठावंत आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु पक्ष निष्ठा ही आपनहुन सांगायची नसते तर इतर लोकच निष्ठा ठरवत असतात..

आसे काही लोक स्वताच्या फायद्यासाठी कोणाचा तरी उदो उदो करीत असतात.समजा कोणाला स्वताच्या फायद्याच्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर त्यांनी जरुर कराव्यात  परंतु पक्षातील नेत्यांनबद्दल उगीचच कशाला संभ्रम निर्माण करायचा. हे चुकीचे आहे...

  शेतकरी कामगार पक्ष हा सामुदायिक निर्णय घेणारा पक्ष आहे.ईथे एका दुसऱ्याच्या मतांवर काही निर्णय घेतले जात नसतात हे लक्षात ठेवावे.

   शेतकरी कामगार पक्ष आजतरी भक्कमपणे भाई चंद्रकांत (दादा)देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ भाई बाबासाहेब यांच्या नेतृत्वाखाली योग्य दिशेने वाटचाल करीत आहे.आपण चिंता करु नका .

 पक्षामध्ये काम करीत आसताना‌ एखादं चांगलं काम करता नाही आले तर हरकत नाही परंतु चुकीचे काम करु नये .व‌ संभ्रम निर्माण करु नये .आबासाहेबांच नाव घेऊन काही लोक चुकीचे काम करीत आहेत ते चुकीचे काम जनता जनार्दन चांगल्या प्रकारे जाणते हे लक्षात ठेवावे असे मत अँड धनंजय मेटकरी यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments